किटकनाशक कंपन्यांच्या मनमानी विरोधात शेतकरी व व्यापाऱ्यांचा मोर्चा यशस्वी-NNL

हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सिटु कमिटीच्या वतीने उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन -NNL

नांदेड। सिटु जिल्हा कमिटीच्या वतीने अदामा, गोदरेज, एमएमसी, बीएएसएफ या कीटनाशक कंपन्या बेकायदेशीर रित्या नवा मोंढा येथील व्यापारी सचिन कासलीवाल यांच्या दुकानांमध्ये जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत कासलीवाल यांच्या दुकानाची तपासणी करून अवमान केल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांना निवेदन देण्यात आलेयावेळी व्यापारी सचिन कासलीवाल यांच्यासह सिटु संघटनेचे अध्यक्ष उज्वला पडलवार, जनरल सेक्रेटरी गंगाधर गायकवाड, पप्पू जाधव, संतोष गव्हाणे, पंजाब काळे, बालाजी आबादार, रणजीत देशमुख आदींसह सिटु संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या मोर्चा व निवेदनाव्दारे अदामा, गोदरेज, एफएमसी, बीएएसएफ सारख्या किटक नाशके कंपन्या बेकायदेशीरस्यिा पेस्टीसाईड दुकानांमध्ये तपासणी करीत आहेत आणि त्यांच्या सोबत कृषी विभागाचे कुणीही अधिकारी किया कर्मचारी उपस्थित राहात नाहीत. त्यांची चौकशी करून व्यापाऱ्यांचा अवमान करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी.नांदेड शहरातील नवा मोंढा येथील प्रसिद्ध व्यापारी श्री सचिन कासलीवाल यांच्या दुकानात बेकायदेशीररित्या प्रवेश करून त्यांचा व त्यांच्या कर्मचाऱ्यांचा अवमान केला आहे.

नांदेड जिल्ह्यातील काही अधिकृत वितरक हे परजिल्ह्यात व परराज्यात औषधे विकत आहेत व किटक नाशकाचे दर मोठ्या प्रमाणात आहेत.तसेच शेतकी औषधे विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता होत आहे. औषधी उत्पादन किमतीपेक्षा १००% जास्त दराने शेतकऱ्यांना माल विक्री केला जात आहे. याची चौकशी करून योग्य कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे .

यासोबतच जुलै २०२३ मधील चे नांदेड शहरातील पूरग्रस्तांचे थकीत अतिवृष्टीचे अनुदान तात्काळ देण्यात यावे आणि नांदेड येथील संजय गांधी योजनेतील तलाठी शेळके यांची बदली करावी. शहरातील नमस्कार चौक येथे सुलभ सौचालय तातडीने बांधण्यात यावे. बजरंग कॉलनी येथे बोअखेल निर्माण करावेत.तसेच २०२३ मधील अतिवृष्टीत मरण पावलेल्या पूरग्रस्त रामदास लोखंडे यांच्या कुटुंबाचे नांदेड शहरात पुरर्वसन करावे व त्यांच्या मुलास मनपा नांदेडमध्ये नोकरी द्यावी आणि २५ लाख रूपयांची आर्थिक मदत करावी अशा विविध मागण्या या निषेध मोर्चा व निवेदनाव्दारे करण्यात आल्या आहेत .

या मोर्चात मोंढा येथील कामगार, व्यापारी, हमाल आणि शेतकरी, पूरग्रस्त मोठ्या संख्येने सामील झाले होते यावेळी शासन तसेच जिल्हा प्रशासनाने आमच्या विविध मागण्यांचा विचार करून त्यावर योग्य तो तोडगा काढावा अशी मागणी व्यापारी सचिन कासलिवाल यांनी यावेळी केली आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button