नांदेड l अखिल भारत पदमशली संघम हैद्राबाद संलग्न असलेल्या मराठवाडा पदमशली महासभेचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम 2025-2030 च्या अनुषंगाने दिनांक 8 डिसेंबर 2024 रोजी मराठवाडयाचे केंद्र बिंदू असलेल्या नांदेड शहरातील संत ज्ञानेश्वर मंदिर,मंगल कार्यालय, विणकर कॉलोनी चौफाळा,नांदेड येथे पदमशाली समाजाची एक व्यापक बैठक संपन्न झाली.
कार्यक्रमांची सुरुवात समाजाचे आराध्य कुलदैवत महर्षी मार्कडेय ऋषीं यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवारांच्या हस्ते करण्यात आले.या बैठकीत अखिल भारत पदमशली संघम ही संस्था 103 वर्षाची जुनी असून तिला सामाजिक परंपरा लाभली आहे.या संस्थेने असंख्य सामाजिक उपक्रम राबविले आहेत.या संघम मध्ये गरीबातला गरीब समाज बांधव सुद्धा एखाद्या उच्च पदावर जाऊ शकतो कारण इथे लोकशाही पद्धतीने निवडणूक पार पडते.सध्या जुन्या पदाधिकार्यांचा कार्यकाळ संपला असल्याने लवकरच तालुका व जिल्हा पातळीवर सभासद नोंदणी करून निवडणुका पार पडणार आहेत. समाजातील गटतट, मनभेत बाजूला ठेवून आपल्या क्षेत्रातील अध्यक्ष कसा सक्षम असला पाहिजे त्यासाठी समाजाणे एकरूप होऊन निवड केली पाहिजे असे आवाहन मुख्य निवडणुक निर्णय अधिकारी श्री.लक्ष्मीकांत गोणे यांनी व्यक्त केले.
यावेळी उपस्थित अनेक मान्यवरांची भाषणे झाली.साधक बाधक चर्चे अंती सर्वांनी एकदिलाने काम करण्याचे ठरले.या बैठकीत मराठवाडा पदमशली महिला संघटना व नांदेड जिल्हा पदमशली युवक संघटना यांच्या कार्यकाळत पारपडलेल्या कार्यक्रमाचा व कार्याचा जाहीर हिशोब सादर करण्यात आला.
यावेळी संघटनेच्या कार्याचा अनेकांनी गौरव केला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ मार्गदर्शक श्रीधरराव सुंकरवार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रल्हादराव सुरकुटवार,गोविंदसेठ कोकुलवार,व्यंकटेश जिंदम,अशोक श्रीमनवार,गणेशराव गुंडेवार,नागभूषण दुर्गम,सौ.कविता गड्डम,नागेंद्र आलशेट्टी,व्यंकटराव चिलवरवार,प्रशांत गड्डम,गजुशेठ श्रीमनवार, यांच्यासह सर्वश्री नागनाथ गड्डम, संग्राम निलपत्रेवार, शिवाजी अन्नमवार, भारत गठेवार, धनंजय गुमलवार, शिवशंकर सिरमेवार, प्रा.गोविंद रामदीनेवार, विजय अण्णा वडेपल्ले.
संतोष गुंडेटवार लक्ष्मण चन्नावार,डॉ.प्रशांत सबनवार,निलेश बिरेवार, साईनाथ चन्नावार,श्रीराम सुंकेवार,भुमाजी मामीडवार,पत्रकार गजानन जिड्डेवार,सौ.माधवी गुम्मलवार, सौ. कविता मामीडवार,युवक संघटनेचे बजरंग नागलवार, श्रीनिवास गुरम, प्रवीण राखेवार,व्यंकटेश अमृतवार,प्रल्हाद गुजरवार,अजय चौधरी, धनंजय माडेवार,व्यंकटेश पुलकुंठवार, सत्यजित टिप्रेस्वार,मधुकर पुरणेकर,तसेच योगेश कोकुलवार,दत्तप्रसाद सुरकुटवार,साई राखेवार, चंद्रकांत धसकनवार,गणेश कोकुलवार,दत्तात्रेय उपलचवार, कृष्णा कोकुलवार.
जगनाथ तालकोकुलवार,अशोक मेरगेंवार,विनोद रखेवार, चंद्रकांत नागूल, किशोर नागूल, महेश रच्चावार,दत्ता कोम्पलवार,ज्ञानेश्वर चरपीलवार,साई कोकुलवार,सुरज कोकुलवार,दिंगंबर रच्चेवार, नरसिंग यंगलवार, गंगाधर बिंगेवार,गणेश श्रीरामवार,राजेश हसनपल्ली, रुपेश रच्चेवार,गंगाधर गोनेवार, आकाश रब्बेवार यांच्यासह अनेक समाज बांधव शहरातील व ग्रामीण भागातील मोठया संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी अन्नमवार यांनी केले तर आभार प्रदर्शन संग्राम निलपत्रेवार यांनी केले.