Padmashali Mahasabha ; मराठवाडा पद्मशाली महासभेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर – NNL
नांदेड l अखिल भारत पदमशली संघम हैद्राबाद संलग्न असलेल्या मराठवाडा पदमशली महासभेचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम 2025-2030 च्या अनुषंगाने दिनांक 8 डिसेंबर 2024 रोजी मराठवाडयाचे केंद्र बिंदू असलेल्या नांदेड शहरातील संत ज्ञानेश्वर मंदिर,मंगल कार्यालय, विणकर कॉलोनी चौफाळा,नांदेड येथे पदमशाली समाजाची एक व्यापक बैठक संपन्न झाली.
कार्यक्रमांची सुरुवात समाजाचे आराध्य कुलदैवत महर्षी मार्कडेय ऋषीं यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवारांच्या हस्ते करण्यात आले.या बैठकीत अखिल भारत पदमशली संघम ही संस्था 103 वर्षाची जुनी असून तिला सामाजिक परंपरा लाभली आहे.या संस्थेने असंख्य सामाजिक उपक्रम राबविले आहेत.या संघम मध्ये गरीबातला गरीब समाज बांधव सुद्धा एखाद्या उच्च पदावर जाऊ शकतो कारण इथे लोकशाही पद्धतीने निवडणूक पार पडते.सध्या जुन्या पदाधिकार्यांचा कार्यकाळ संपला असल्याने लवकरच तालुका व जिल्हा पातळीवर सभासद नोंदण...
