किटकनाशक कंपन्यांच्या मनमानी विरोधात शेतकरी व व्यापाऱ्यांचा मोर्चा यशस्वी-NNL
नांदेड। सिटु जिल्हा कमिटीच्या वतीने अदामा, गोदरेज, एमएमसी, बीएएसएफ या कीटनाशक कंपन्या बेकायदेशीर रित्या नवा मोंढा येथील व्यापारी सचिन कासलीवाल यांच्या दुकानांमध्ये जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत कासलीवाल यांच्या दुकानाची तपासणी करून अवमान केल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांना निवेदन देण्यात आलेयावेळी व्यापारी सचिन कासलीवाल यांच्यासह सिटु संघटनेचे अध्यक्ष उज्वला पडलवार, जनरल सेक्रेटरी गंगाधर गायकवाड, पप्पू जाधव, संतोष गव्हाणे, पंजाब काळे, बालाजी आबादार, रणजीत देशमुख आदींसह सिटु संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मोर्चा व निवेदनाव्दारे अदामा, गोदरेज, एफएमसी, बीएएसएफ सारख्या किटक नाशके कंपन्या बेकायदेशीरस्यिा पेस्टीसाईड दुकानांमध्ये तपासणी करीत आहेत आणि त्यांच्या सोबत कृषी विभागाचे कुणीही अधिका...
