नांदेडराजकीय

Marathwada issues! : खा. अशोकराव चव्हाण व भाजपच्या खासदार-आमदारांनी मराठवाड्याच्या प्रश्नांकडे वेधले शाह, फडणविसांचे लक्ष!

नांदेड| नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्याच्या अनेक प्रश्नांकडे खा. अशोकराव चव्हाण व भाजपच्या लोकप्रतिनिधींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले आहे. भाजपच्या शंखनाद सभेचे औचित्य साधून उभय नेत्यांच्या नांदेड भेटीदरम्यान त्यांना यासंदर्भातील निवेदने देण्यात आली

सोमवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृहात काही शिष्टमंडळांनी अमित शाह व देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी खा. अशोकराव चव्हाण यांच्यासह खा.डॉ. अजित गोपछडे, आ. भीमराव केराम, आ. तुषार राठोड, आ. राजेश पवार, आ. जितेश अंतापूरकर, आ. श्रीजया चव्हाण यांनीही दोन्ही वरिष्ठ नेत्यांशी अनेक सार्वजनिक मुद्यांवर चर्चा केली. खा. अशोकराव चव्हाण यांनी रेल्वे, रस्ते, आरोग्य व रोजगार निर्मितीबाबत निवेदने दिली.

यामध्ये रेल्वेबाबतच्या निवेदनात नांदेड परिसरात नवीन रेल्वे कोच निर्मिती प्रकल्प उभारणे, नांदेड-बिदर रेल्वे मार्गाला कर्नाटककडून संमती मिळवून काम सुरु करणे, नांदेड-लातूर थेट नवीन रेल्वे मार्गाला मंजुरी देणे, नांदेडहून मुंबई व अमृतसरसाठी अमृत भारत एक्सप्रेस, हैद्राबादसाठी वंदे भारत तर अहमदाबादसाठी रोज धावणारी सुपरफास्ट एक्सप्रेस सुरु करण्याच्या मागणीचा समावेश आहे.

याशिवाय नांदेड-मुंबई थेट विमानसेवेसाठी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर स्लॉट उपलब्ध करून देणे, मुदखेड येथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचा कायम स्वरुपी तळ स्थापन करणे, नांदेड-हैद्राबाद नवीन द्रुतगती महामार्ग मंजूर करून त्याला नियोजित जालना-नांदेड समृद्धी महामार्गाला जोडण्याची मागणी खा. अशोकराव चव्हाण यांनी मांडली.

नांदेड येथे विभागीय महसूल आयुक्तालय स्थापन करण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणे, महाराष्ट्रात येणाऱ्या नवीन औद्योगिक प्रकल्पांपैकी काही प्रकल्प नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात उभारून रोजगार निर्मितीस चालना देणे, तसेच नांदेड येथील श्री गुरु गोबिंदसिंघजी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या ५०० खाटांच्या श्रेणीवर्धनाच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्याच्या विषयावर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button