क्राईमनांदेड

Usmannagar ; उस्माननगर पोलीस व महसूल प्रशासनाची येळी रेती घाटावर पुन्हा कारवाई; तब्बल २.४८ कोटींचे साहित्य जप्त

उस्माननगर l लोहा तालुक्यातील येळी घाटावर पून्हा एकदा पोलिस व महसूल विभागाच्या पथकाने रविवारी रात्री घाड टाकली. या कारवाईत २ लोखंडी बोट, ४ टिप्पर, २ जेसीबी, ४ हायवा असा २ कोटी ४८ लाख १३ हजाराचे साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी ८ जणांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

लोहा तालुक्यातील येळी घाटावर रविवारी रात्री पोलिस व महसूल विभागाच्या पथकाने संयुक्तरीत्या घाड टाकली. रात्री सुरू झालेली कारवाई सोमवारी पहाटेपर्यंत सुरू होती. यात २ लोखंडी बोट किंमत १०लाख रुपये, ४ टिप्पर १२ लाख, १ टाटा कंपनीची जेसीबी मशीन ५० लाखे त्याचबरोबर टाटा हिताई एक्स ७० कंपनीची जेसीबी मशीन ५० लाख, ४ हायवा अंदाजे किंमत ८० लाख असा एकूण २ कोटी ४८ लाख १३ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.

IMG 20250303 WA0010 Usmannagar ; उस्माननगर पोलीस व महसूल प्रशासनाची येळी रेती घाटावर पुन्हा कारवाई; तब्बल २.४८ कोटींचे साहित्य जप्त

या प्रकरणी राजू कोंडीबा पाकलवाड रा. वाघाळा, प्रभू माधव घसाडे रा. कौडगाव, सचिन हरिचंद्र जाधव रा. सातेगाव दत्ता हरी लक्ष्मण कंधारे राहणार धानोरा, माघव पिराजी शिंजोरे रा. बळेगाव, श्रावण केशव शिराळे रा. बारूळ, शहाजी मोहनराव सावंत रा. हातनी, ज्ञानेश्वर दिगंबर वाघमारे रा. भायेगाव या ८ जणांला ताब्यात घेऊन गुन्हे दाखल करण्यात आले. येळी घाटावर यापूर्वी देखील घाडसी कारवाई झाली होती.

सदर कारवाई अप्पर पोलिस अधीक्षक सुरज गुरव, उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी जगताप, उपविभागीय दंडाधिकारी संगेवार, लोहा येथील तहसीलदार परळीकर उस्माननगरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पवार, गजानन गाडेकर, पोहेकॉ हंबर्डे, श्रीमंगले महसूल व उस्माननगर पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. या कारवाईबद्दल जिल्हा पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांनी पथकास कौतुकाची थाप दिली.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!