Usmannagar ; उस्माननगर पोलीस व महसूल प्रशासनाची येळी रेती घाटावर पुन्हा कारवाई; तब्बल २.४८ कोटींचे साहित्य जप्त
उस्माननगर l लोहा तालुक्यातील येळी घाटावर पून्हा एकदा पोलिस व महसूल विभागाच्या पथकाने रविवारी रात्री घाड टाकली. या कारवाईत २ लोखंडी बोट, ४ टिप्पर, २ जेसीबी, ४ हायवा असा २ कोटी ४८ लाख १३ हजाराचे साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी ८ जणांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
लोहा तालुक्यातील येळी घाटावर रविवारी रात्री पोलिस व महसूल विभागाच्या पथकाने संयुक्तरीत्या घाड टाकली. रात्री सुरू झालेली कारवाई सोमवारी पहाटेपर्यंत सुरू होती. यात २ लोखंडी बोट किंमत १०लाख रुपये, ४ टिप्पर १२ लाख, १ टाटा कंपनीची जेसीबी मशीन ५० लाखे त्याचबरोबर टाटा हिताई एक्स ७० कंपनीची जेसीबी मशीन ५० लाख, ४ हायवा अंदाजे किंमत ८० लाख असा एकूण २ कोटी ४८ लाख १३ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी राजू कोंडीबा पाकलवाड रा. वाघाळा, प्रभू माधव घसाडे रा. कौडगाव, सचिन हरिचंद्र जाधव रा. सातेगाव दत्ता हरी लक्ष्मण...
