Shri Hanuman Temple : हिमायतनगरातील संकटमोचन श्री हनुमान मंदिराचा कलशारोहण सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| हिमायतनगर (जि. नांदेड) येथील छत्रपती शिवाजीनगर, रेल्वे स्टेशन रोड येथे असलेल्या संकटमोचन श्री हनुमान मंदिराचा कलशारोहण सोहळा दि. २२ फेब्रुवारी रोजी अत्यंत भक्तिमय वातावरणात व उत्साहात संपन्न झाला.

रविवार सकाळी ६ वाजता अभिषेक, होमहवन व विधिवत पूजा पुरोहित श्री सुनील जोशी महाराज यांच्या मंत्रोच्चारात पार पडली. त्यानंतर महंत आनंद भारती महाराज (दिशा आश्रम मठ, हरदडा) यांच्या हस्ते कलशाची पूजा-अर्चना करण्यात आली. मंत्रोच्चार व भक्तांच्या जयघोषात कलशारोहण व ध्वजारोहण सोहळा थाटात पार पडला.

सोहळ्यावेळी “बजरंग बली की जय… पवनसूत हनुमान की जय…” अशा जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. भाविकांनी मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहून संकटमोचन हनुमानाचे दर्शन घेतले. दरम्यान, माजी आमदार माधवराव पाटील जवळगांवकर, कृष्णा पाटील आष्टीकर, श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी अनंता देवकते, नगरसेवक सुभाष बल्पेलवाड, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगांवकर आदिसह अनेक मान्यवरानी संकटमोचन हनुमान मंदिराला भेट देऊन हनुमंत रायाचे दर्शन घेतले व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.

सोहळ्यानिमित्त परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, दुपारी भव्य महाप्रसादाचा पंगती संपन्न झाल्या. पंचक्रोशीतील भाविक भक्त व महिला पुरुष नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कलशरोहन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी छत्रपती शिवाजी नगर भागातील सर्व महिला व पुरुष नागरिकांनी परिश्रम घेतले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button