नांदेड/माळेगाव यात्रा। माळेगाव यात्रेत अनेक वर्षा पासून लोकनाट्य तमाशा फड येतात बदलत्या काळात तमाशा पाहणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस घटते आहे. पण महाराष्ट्राची लोकधार असलेल्यरं या पारंपरिक कलेची जोपाण्याची करण्याची गरज असून, कलावंताच्या समस्या त्याच्या अडीअडचणी शासन दरबारी मांडू असे जिल्ह्याचे नेते आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी तमाशा फड मालकांना आश्वासित केले.
आ. प्रतापराव पाटील चिखलीकर स्वतःयात्रेत फेरफटका मारला यंदाही यात्रेतील अश्व मालक , तसेच छोटे मोठे व्यापारी याचे म्हणणे तसेच त्याच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व त्याची सोडवणूक केली प्रशासनाला सूचना केल्या लोकनाट्य तमाशा हे माळेगाव यात्रेचे एक खास वैशिष्ट्य मानले जाते
यंदा यात्रेत . रघुवीर खेडकर , मंगला बनसोडे, पांडुरंग मुळे मांजरवाडीकर, आनंद लोकनाट्य मंडळ, हरिभाऊ बडे हे पाच लोकनाट्य आले आहेत. जिल्ह्याचे नेते व या भागाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी या पाचही तंबू जाऊन फड मालकांच्या भेटी घेतल्या.
राज्याच्या वेगवेगळ्या भागात तमाशाचे प्रयोग हे विजयादशमी ते वैशाखी पूर्णिमा या काळात चालतात.पण सोशल मीडियाच्या काळात रसिकांची अभिरुची बदलली .त्यामुळे ३७ लोकनाट्य पैकी केवळ सात लोकनाट्य तमाशा आता शिल्लक राहिले आहेत.ही कला आता शेवटची घटिका मोजत आहे.अशी पोटतिडक फड मालक बोलून दाखवत होते .तमाशा तंबूत जवळपास शंभर -सव्वाशे कलाकार -,कामगार असतात त्यातुलनेत प्रेक्षक वर्ग ” वग ‘ पाहण्यासाठी येत नाहीत शिवाय वेळेचे बंधन आहे पूर्वी पहाटे पाच वाजेपर्यंत प्रयोग (खेळ) चालत असे आता तसे होत नाही.
फड मालक, कलावंतांना प्रतापरांवाच्या समोर मांडल्या …तमाशा कलावंताना मानधन,दयावे तसेच राज्यात सर्व ठिकाणी आमच्या वाहनांना टोल माफी,असावीकोरोना काळात जे पॅकेज दिले होते त्याच धर्तीवर शासनाने मदत शासन द्यावी तमाशा व त्याची कला जोपासण्यासाठी प्रयत्न व्हावेत असा मागण्या कलावंतांनी केल्या पण माळेगाव यात्रेत आम्हा तमाशा कलावंतांना जेवढी सुरक्षा मिळते तेवढी राज्यात कुठेही मिळत नाही अन्यत्र .खूप त्रास होतो आपल्या मुळे येथे पोलीस संरक्षण मिळते याची आम्हाला जाणीव आहे असा भावना तमाशा फड मालकांनी बोलून दाखवल्या.
आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पाचही फड मालकांच्या समस्या अडीअडचणी त्याचे म्हणणे ऐकून घेतल्या . त्याच्या बक्षीस रक्कमे वाढ करण्याचा निर्णय घेतला तसेच यात्रेला जे वैभव आले त्याच आपल्या लोकनाट्य तमाशा फडाचे मोठे योगदान आहे आपल्या मागण्याच्या बाबत पुढाकार घेऊन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ,सांस्कृतिक मंत्री याच्याकडे या मागणी साठी पाठपुरावा करू असे आमदार प्रतापराव यांनी तमाशा फड कलावंतांना आश्वासित केले याबत एक सविस्तर पत्र तयार केले असून लवकरच या तमाशा कलावंतांच्या मागण्यांसाठी पाठपुरावा करू असे प्रतापरावांच्या सांगितले.