नासिक। मागील ३७ वर्षा पासून पत्रकारिता क्षेत्रात अग्रेसर असलेले नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार श्री पंढरीनाथ बोकारे यांना २०२४ चा ‘बाळशास्त्री जांभेकर दर्पणकार‘ पुरस्कार जाहीर झाला असून पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला ता.५ जानेवारी रोजी नासिक येथे प्रदान होणार आहे.
सक्षम टाइम्स मिडिया फाउंडेशन व सक्षम पोलीस टाइम्स वृत्तपत्र यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीमित्त मराठी पत्रकार दिवस साजरा होत असून पत्रकार दिनाचे औचित्य साधुन रविवार दि. ५ जाने. २०२५ रोजी नासिक येथे या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. सक्षम टाइम्स मिडिया फाउंडेशन चे अध्यक्ष विलास पाटील यांनी हि माहिती दिली आहे. श्री बोकारे हे पत्रकारितेतील अनुभवाच्या बाबतीत नांदेड मध्ये एक अग्रगण्य नाव आहे. मागील ३७ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे.
श्री बोकारे यांनी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जनसंपर्क अधिकारी म्हणून १७ वर्ष सेवा बजावली आहे. ज्यात त्यांनी जनसंपर्क च्या माध्यमातून बँकेची छबी उंचावण्यात महत्वपूर्ण योगदान दिले. श्री बोकारे यांनी २००३ साली नानक साई फाऊंडेशन नावाची सेवाभावी संस्था स्थापन केली. या संस्थेचे उदिष्ट म्हणजे पंजाब आणि महाराष्ट्र या दोन राज्या मधील बंधू प्रेम वाढवणे आणि सांस्कृतिक देवाण घेवाण करणे आहे. फाऊंडेनचे माध्यमातून त्यांनी संत नामदेव घुमान सद्भावना यात्रा या उपक्रमाची सुरुवात केली.
ज्यामध्ये लोक उत्तर भारतातील धार्मिक व ऐतिहासिक स्थळांना भेट देतात. हा उपक्रम लोकप्रिय ठरत असून हि यात्रा अता घुमान चळवळ या नावाने ओळखली जात आहे. श्री बोकारे याना पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील योगदाना बद्दल जवळपास ४० विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. बाळशास्त्री जांभेकर दर्पणकार‘ पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल बोकारे यांना लंगर साहिब गुरुद्वारा चे प्रमुख संत बाबा नरेंद्रसिंघ जी,संत बाबा बलविंदर सिंघ जी आणि नांदेड चे खासदार प्रा रवींद्र चव्हाण, खासदार डॉ अजित गोपछडे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.