Pandharinath Bokare ; पंढरीनाथ बोकारे यांना बाळशास्त्री जांभेकर दर्पणकार पुरस्कार जाहीर : ५ जानेवारी रोजी नासिक येथे प्रदान होणार -NNL
नासिक। मागील ३७ वर्षा पासून पत्रकारिता क्षेत्रात अग्रेसर असलेले नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार श्री पंढरीनाथ बोकारे यांना २०२४ चा ‘बाळशास्त्री जांभेकर दर्पणकार‘ पुरस्कार जाहीर झाला असून पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला ता.५ जानेवारी रोजी नासिक येथे प्रदान होणार आहे.
सक्षम टाइम्स मिडिया फाउंडेशन व सक्षम पोलीस टाइम्स वृत्तपत्र यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीमित्त मराठी पत्रकार दिवस साजरा होत असून पत्रकार दिनाचे औचित्य साधुन रविवार दि. ५ जाने. २०२५ रोजी नासिक येथे या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. सक्षम टाइम्स मिडिया फाउंडेशन चे अध्यक्ष विलास पाटील यांनी हि माहिती दिली आहे. श्री बोकारे हे पत्रकारितेतील अनुभवाच्या बाबतीत नांदेड मध्ये एक अग्रगण्य नाव आहे. मागील ३७ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे.
...
