नवीन नांदेड l किवळा येथील पाणी साठवण तलाव लगत असलेल्या बाभुळगाव येथील शेतकऱ्यांना पाणी साठवण तलावातून शेती साठी विघुत लाईट ,रस्ता तयार करून द्यावी व शेतकरी बांधवांच्या अडीअडचणी सोडविण्याची मागणी सरपंच पुंडलिक मस्के यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांच्या कडे प्रत्यक्ष भेटून केली.
31डिसेबंर रोजी जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत,मनपा आयुक्त डॉ.महेश कुमार डोईफोडे, पाटबंधारे विभागाचे अभियंता यांनी किंवळा पाणी साठवण तलाव भेट देऊन पाहणी केली व चर्चा केली.
या प्रतिष्ठित नागरिक चक्रधर पाटील मोरे, माजी चेअरमन प्रभाकर पाटील मोरे, बालाजी पाटील मस्के, भगवान मस्के,काळेश्वर मस्के, व ग्रामस्थ यांनी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी व तलाव परिसरातून शेतकरी बांधवांना पाणी पुरवठा साठी विद्युत लाईट व्यवस्था करून देण्यात यावी,यासह अन्य मागण्यांबाबत चर्चा केली, प्रारंभी जिल्हाधिकारी यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी जिल्हाधिकारी यांनी समस्या ऐकुण शेतकऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्या संदर्भात आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले, यावेळी पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.