अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास 25 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा -NNL

सदरील गुन्ह्यामध्ये सरकारतर्फे एकूण 9 साक्षीदार तपासण्यात आले

नांदेड। जिल्ह्यातील बिलोली येथिल मा. तदर्थ जिल्हा न्यायधीश-१ तथा अति. जिल्हा न्यायाधीश बिलोली श्री. व्ही. ब. बोहरा यानी आरोपी यादव बंडाभोई बट्टलवाड, वय: 50 वर्षे, रा. अजनी, ता. बिलोली, जी. नांदेड यास *कलम 376(2)(N), भा.द. वि. आणि कलम 4,6,10 पोक्सो. अंतर्गत 20 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व दंड रु. 25,000/- व दंड न भरल्यास 6 महिने सश्रम कारावासाची शिक्षा आणि कलम 506 भा.द. वि. अंतर्गत 5 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व दंड रु. 5,000/- व दंड न भरल्यास 6 महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, यातील पीडित मुलगी ही आई लहनपणी वारली असल्याममुळे आणि वाडिलानी दुसरे लग्न केले असल्यामुळे मामाच्या गावी अजनी ता. बिलोली येथे अजी आजोबा आणि मामा सोबत राहत होती. माहे ऑक्टोबर 2020 मध्ये पीडितेची मावशी बाळंतपनासाठी माहेरी आजनी येथे आली व दिनांक 28/11/2020 रोजी पीडित मुलीची मावशीच्या पोटात दुखत असल्याने पीडितेचे अजी आजोबा मामा यांनी पीडितेच्या मावशीला लोहगाव येथे सरकारी दवाखान्यात घेऊन गेले. व दि. 29/11/2020 रोजी पीडितेच्या मावशीला मुलगी झाली. त्यामुळे पीडितेचे अजी आजोबा दवाखान्यात होते. 

दि. 01/12/2020 रोजी दुपारी पीडितेचे मामा पीडितेला शेताकडे जाऊन जनावरांना चारा पाणी कर असे सांगून तो देखील दवाखान्यात लोहगाव येथे गेला. त्यामुळे पीडित मुलगी मामाच्या सांगण्यावरून शेताकडे जनावरांना चारा पाणी करण्यासाठी गेली असता. पीडित मुलीच्या अजी आजोबांच्या शेताच्या बाजूला बांधाला लागून चुलत आजोबा यादव बंडाभोई बट्टलवाड यांचे शेत होते व शेतात यादव बट्टलवाड होता. पीडित मुलगी एकटी पाहून आरोपी यादव बट्टलवाड याने अजी आजोबा कुठे आहेत असे विचारले व त्यावर पीडित मुलगी अजी आजोबा आणि मामा लोहगाव येथे मावशी बाळंतीण झाली त्यामुळे दवाखान्यात गेलेत असे सांगली तेंव्हा. आरोपी यादव बंडाभोई बट्टलवाड याने पीडित मुलीचे तोंड दाबून धरून तिथेच अडव पडून शेतातच जबरी अत्याचार केला. 

त्यानंतर पुढील महिनाभर शेतात कोणी नसल्याचे पाहून पाच सहा वेळेस जबरी अत्याचार केला आणि कोणाला संगल्यास मारुन टाकतो अशी धमकी दिली. त्यामुळे पीडित मुलगी घडलेली घटना कोणालाही सांगितली नाही. त्यानंतर चार पाच महिन्यांनी पीडित मुलीचे पोट वाढल्याने अजी आजोबा विचारल्यावर घडलेली हकीकत पीडित मुलीने अजी आजोबा यांना सांगितली. त्यावरुन दि. 28/07/2021 रोजी पोलीस स्टेशन बिलोली येथे आरोपी विरुद्ध तक्रार दिली. पीडित मुलीच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध कलम 376(2)(N), 506 भा. द. वि. आणि कलम 4,6,10 पोक्सो. नुसार पो. स्टे. बिलोली येथे गुन्हा दाखल झाला. सदरील गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊन दोषारोप पत्र मा. अति. सत्र न्यायालय बिलोली येथे दाखल करण्यात आले.

सदरील गुन्ह्यामध्ये सरकारतर्फे एकूण 9 साक्षीदार तपासण्यात आले. मा. न्यायालयासमोर आलेल्या साक्षी पुराव्याचा विचार करून तसेच मा. सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन मा. न्यायाधीश साहेबांनी दि. 06/06/2024 रोजी वरील प्रमाणे शिक्षा ठोठावली. सरकारतर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्री. संदीप भिमराव कुंडलवाडीकर यांनी बाजू मांडली. सदर प्रकरणात पो.उप.नि. श्री. संनगले यांनी तपास पूर्ण केला. तसेच पैरावी अधिकारी पोलिस हेडकॉन्स्टेबल एम. ए. शेख (ब. न. 1870) पो. स्टे. बिलोली यांनी सहकार्य केले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button