Homeक्राईमअज्ञात महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मुत्तदेह आढळला जिल्हा पोलीस अधिक्षकांनी दिली घटनास्थळी...

अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मुत्तदेह आढळला जिल्हा पोलीस अधिक्षकांनी दिली घटनास्थळी भेट -NNL

श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। माहूर किनवट राष्ट्रीय महामार्गावरील नखेगाव ते हिवळणी फाट्याच्या मध्ये मुख्य रस्त्यावर असलेल्या हिवळणी येथील तुलसीराम राठोड यांच्या शेताच्या धु-यावर अज्ञात महिलेला तुराट्या व प-याट्या टाकून जाळल्याची घटना दिनांक ५ जून रोजी रात्री ९.३० वाजता उघडकिस आली आहे.

माहूर पासुन ९ कि,मी, अंतरावर असलेल्या माहूर किनवट राष्ट्रीय महामार्गावरील मेन रोड वर असलेल्या आष्टा फाट्याजवळ तुळशीराम राठोड यांच्या शेतात रोड वरुन २०० मिटर अंतरावरा त्याच्या विहिरीजवळ कापसाच्या व तुरीच्या प-याट्या ठेवलेल्या होत्या व जवळच स्पिंकलरची पाईप व नोझल ठेवलेले होते व,तेथे रात्री ९ वा मोठ्या प्रमाणात आग दिसल्याने शेत मालक शेतात आले , व आग विझवण्याचा प्रयत्न केला सर्व आग विझल्यावर अज्ञात महिला जळालेल्या अवस्थेत मुत्तदेह दिसल्याने त्यानी माहूर पोलीसांना माहिती दिली. घटनास्थळावर माहूर पोलीस ठाण्याचे सपोनी शिवप्रकाश मुळे यांचे सह पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता तिच्या हातात बांगड्या आणि पायात जोडवे दिसून आले या व्यतिरिक्त तिची ओळख पटण्यासारखा कुठलाही पुरावा तेथे आढळून आला नाही.

IMG 20240606 WA0039 अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मुत्तदेह आढळला जिल्हा पोलीस अधिक्षकांनी दिली घटनास्थळी भेट -NNL

रात्रीच मुत्तदेह शवविच्छेदना करीता माहूर ग्रामीण रुग्णालयात आणन्यात आला, दि ६ जुन रोजी सकाळीच जिल्हा पोलीस अधिक्षक श्री कुष्ण कोकाटे स्थागुशाचे उदय खडेराय यांनी घटनास्थळी भेट देउन पाहणी केली. घटनेच्या तपासाचे कडवे आव्हान माहूर पोलीसांसमोर आहे. या महीलेला जाळून पुरावा नष्ट करण्यामागचा उद्देश्य काय ? सदरील हत्या अनैतिक संबंधातुन तर झाली नसावी ? असे अनेक प्रश्न असल्याने या घटनेच्या तपासात माहूर पोलीसांचा अक्षरशः कस लागणार हे जवळपास निश्चित आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments