क्राईमनांदेड

सरसम करंजी जवळ गंभीर जखमी अवस्थेत आढळलेल्या युवकांचा मृत्यू.; अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल – NNL

हिमायतनगर तालुक्यातील पवना गावातील मयत युवकाचे नातेवाईक दिली पोलीस ठाण्यात तक्रार

हिमायतनगर। नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात येणाऱ्या सरसम बु. ते करंजी अंतर्गत राष्ट्रीय महामार्गावरील सिमेंट पुलाच्या सुरक्षा भिंतीच्या मध्यभागी रक्ताच्या थारोळ्यात गंभीर अवस्थेत जखमी झालेला युवक बुधवारी आढळून आला होता. त्या जखमीं युवकावर हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करून पुढील उपचारांसाठी नांदेडला रेफर करण्यात आले होते. दरम्यान उपचार सुरू असताना युवकाची प्राणज्योत सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास मालवली. अशिष साईनाथ जाधव वय २८ वर्ष असे मयत युवकाचे नावं आहे. युवकांचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी गुरुवारी सकाळीच हिमायतनगर पोलीस ठाणे गाठून, युवकाला जीवानिशी मारणाऱ्यांचा शोध लावून न्याय देण्याच्या मागणी केली आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध हिमायतनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर ते भोकर या राष्ट्रीय महामार्ग असलेल्या सरसम ते करंजी दरम्यान नाल्यावरील सिमेंट पुलाच्या संरक्षण भिंतीच्या मध्यभागी कोणीतरी अज्ञाताने जिवे मारण्याच्या उद्देशाने पवना येथील युवक अशिष साईनाथ जाधव वय २८ वर्ष यास पाठीमागून येवून डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले होते. हि घटना अंदाजे मंगळवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली असावी असा अंदाज नातेवाईकांनी वर्तविला आहे. डोक्यावर गंभीर प्रहार झाल्याने प्रचंड रक्त स्त्राव झाल्याने तो युवक मृत्यू पावला असल्याचे गृहीत धरून मारणाऱ्यानी तेथून पलायन केले. मात्र रात्रभर युवक त्याचा अवस्थेत राहिल्याने खूप रक्तस्त्राव झाला. बुधवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास ही घटना या रस्त्यावरून मॉर्निग वॉक करणाऱ्या नागरीकांच्या निदर्शनास आली. त्यांनी घटनेची माहिती पोलिसाना देताच जायमोक्यावर पोलीस दाखल झाले होते. युवकावर रात्रीच कुण्यातरी अज्ञाताने हल्ला केला असावा असा संशय अनेकांनी व्यक्त केला. या घटनेमागे कोणते कारण आहे, युवकाला मारण्याचा उद्देश काय..? याबाबत घटनास्थळी जमलेल्या लोकांमध्ये उलट सुलट चर्चा होत होती.

प्राप्त माहितीनुसार सरसम बीटचे पोलीस जमादार श्री कदम सकाळीच आपल्या ताफ्यासह घटनास्थळावर पोचले आणि या ठिकाणाहून दुचाकी क्र. एम. एच. ३८ क्यू ६७१५, चप्पल, आणि एक हाथोडी गंभीर जखमीच्या शेजारी आढळली ती जप्त केली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रभारी पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी सकाळी १० वाजता घटनास्थळी फौज फाट्यासह भेट देऊन पंचनामा केला आहे. गंभीर जखमीस ताब्यात घेऊन हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून प्रकृती गंभीर असल्याने सदर युवकास उपचारांसाठी नांदेडला पाठविण्यात आले होते. दरम्यान गंभीर जखमी युवक अशिष साईनाथ जाधव वय २८ वर्ष याच्यावर उपचार सुरु असताना बुधवारी सायंकाळी ७ वाजता त्याची प्राणज्योत मालवली.

गंभीर जखमी युवकांवर नांदेड येथे उपचार सुरू असताना हिमायतनगर पोलिसांना हा अपघात नसल्याचा संशय आल्यावर त्यांनी तपासाची चक्रे फिरवीत सरसम, सोनारी फाटा येथून सीसीटीव्ही फुटेज एकत्र करून तपासाला गती दिली आहे. त्यामुळे या गुन्ह्याचे स्पष्टीकरण होणार असून, दरम्यान युवकाचा मृत्यू झाल्याने हिमायतनगर पोलीस ठाण्यात मयत युवकाचे नातेवाईक गुरुवारी सकाळी दाखल झाले.  युवकाच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्याचा शोध घेऊन न्याय द्यावा अशी केल्याचे सांगितले. मयत युवकाच्या पार्थिवावर पवना येथे अंत्यसंस्कार करण्यात आले असून, मयताची आई सुंदरबाई साईनाथ जाधव यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलीस या घटनेचा तपास कश्या पद्धतीने लावतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button