State President Anil Waghmare : डिजिटल मीडिया परिषदेच्या युनिट राज्यभरात करणार – प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे -NNL

पुणे| अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी संलग्नित असलेली डिजिटल मीडिया परिषद आगामी काळात आता जोमाने कामाला लागणार असून मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त श्री.एस.एम. देशमुख सर यांच्या आदेशानुसार आपण संपुर्ण महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात महत्वपूर्ण बैठका घेऊन डिजिटल मीडिया परिषदेच्या नवीन जिल्हा कार्यकारणी करण्यासाठी निर्णय घेणार असल्याचे मत डिजिटल मिडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी व्यक्त केले.

ते बीड मध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, महाराष्ट्र राज्यात मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या प्रत्येक जिल्हा पत्रकार संघाशी आपण समन्वय साधून जिल्हा पत्रकार संघाच्या सहकार्याने संपूर्ण महाराष्ट्रात डिजिटल मिडिया परिषदेचे युनिट म्हणजेच नवीन जिल्हा कार्यकारिणी करण्याबाबत विशेष महत्त्व देऊन नियोजनबद्ध प्रक्रिया राबवणार आहोत. प्रत्येक जिल्हा स्तरावर बैठक घेऊन जिल्हाध्यक्ष व इतर पदाधिकारी यांच्या निवडी देखील जाहीर केल्या जाणार आहेत.

महाराष्ट्रातील जिल्हा पदाधिकारी यांनी नवीन निवडी संदर्भात सर्व माहिती तातडीने 9822548696 या वाटस अप नंबर वर मॅसेज करुन कळवावी. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात नवीन युनिट तयार करण्यासाठी सोपं होणार आहे. मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या सर्व जिल्हा पत्रकार संघानी याबाबत दक्षता घेऊन तातडीने माहिती कळवावी असं देखील डिजिटल मिडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी कळविले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button