नांदेड| भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,प.पु.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी कार्य व कर्तत्वाचा वारसा नवपिढीने आत्मसात करण्याची गरज असल्याचे मत नांदेडचे माजी उपनगराध्यक्ष,दलितमित्र किशोर भवरे यांनी व्यक्त केले.
महामानव,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लुंबिनीनगर,प्रभातनगर नांदेड येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी वंदन केले. यावेळी पूढे बोलतांना दलितमित्र किशोर भवरे म्हणाले की,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या महापरिनिर्वाणाच्या पूर्वि नेपाळमधील परिषद आटोपून काठमांडूवरुन कूशिनाराजवळ त्यांचे स्नेही सुरजीतसिंघ बिघेठिया यांच्या वडिल भावाजवळ थांबून सकाळीच कुशिनारा येथे आले.
तथागत सिद्धार्थ गौत्तम बुद्धांनी त्याठिकाणच्या ज्या टेकडीवर आपला देह ठेवला त्या विहारात जाण्यासाठीच्या तिन-चार पायर्या त्यांना चढता आल्या नाही.त्या ठिकाणावरून पून्हा निवासस्थानी येत त्यांनी मुक्काम केला.मात्र त्यांच्या मनात ओढ लागून होती त्यामूळे दुसर्याच दिवशी पूनश्च त्या विहारात येऊन त्यांनी तथागत सिद्धार्थ गौत्तम बुद्धांच्या उजव्या कुशीवर झोपलेल्या मुर्तीचे तिनवेळा गुडघे टेकवून वंदन केले.त्यानंतर जवळच असलेल्या मित्राच्या मोफत हायस्कूलला भेट दिली व त्याठिकाणी विद्यार्थांना संबोधित केले.हे त्यांचे शेवटचे भाषण होते.यावेळी धम्मगुरु चंद्रमुनी त्यांच्यासमवेत होते.
त्या ठिकाणावरुन दिल्ली येथील निवासस्थानी आल्यानंतर त्यांनी त्यांचा माळी यांच्या घरी जाऊन त्यास औषधी दिली व नंतर, निवासस्थानी येऊन स्वतःच्या लायब्ररीतील प्रत्येक ग्रंथ वाचून काढतांनाच त्यांना त्यांनी हाताळले. त्यांनंतर दि.६ डिसेंबर रोजी त्यांचे त्याठिकाणी महापरिनिर्वाण झाले.त्यांचे बौद्ध धम्म,ग्रंथावरिल प्रेम हे मोठे होते. त्यांचे प्रत्येक क्षेत्रातील कार्य व कर्तव्यतत्परता अंत्यत प्रेरणादायी असून ते जोपासीत प्रत्येकांनी मार्गक्रमण करण्याचे आवाहनही यावेळी भवरे यांनी केले. यावेळी प्रशांत सोनसळे, संजय पंडित,संजय ढगे, बि.सी. कांबळे,घोडगे,सोनाळे गूरुजी, बाळू हटकर यांच्यासह लुंबिनीनगर, प्रभातनगर परिसरातील बौद्ध उपासक- उपासिका,लहान-थोर बहुसंख्येने उपस्थित होते.