
नांदेड़| भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ध्वजारोहण कार्यक्रम पार पडल्यानंतर मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.


मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या संकल्पनेतून महापालिकेत उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना Officer of the month व Employee of the month हा पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्काराची सुरुवात आजच्या दिवशी एका वर्षापूर्वी करण्यात आली होती.
Employee of the month साठी माहे जुलै मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मालमत्ता विभागाचे लिपिक ओंकारेश्वर अरविंद स्वामी यांची निवड करून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुरस्कारास पात्र ठरलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या उत्कृष्ट कार्याने महापालिकेची सेवा तत्परतेने बजावल्याबद्दल आज स्वातंत्र्यदिनी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे, अतिरिक्त आयुक्त, श्री गिरीश कदम, उप आयुक्त, अजितपालसिंघ संधू, उप आयुक्त, श्री दिवेकर यांनी त्यांचा विशेष सत्कार केला. भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार व सन्मान झाल्याबद्दल उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संबंधितांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.





