Review meeting : महानगरपालिकेत शहर वाहतुक नियोजनाची आढावा बैठक संपन्न
नांदेड| नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीत शहरातील वाहतुक व्यवस्थेतील सुधारणे संदर्भातील आढावा आज दिनांक ११.०६.२०२५ रोजी *मनपा उपआयुक्त स.अजितपालसिंघ संधु* यांनी महापालिकेत आयोजित बैठकीत घेतला. या बैठकीस शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री गुट्टे व श्री पवार यांची प्रमुख उपस्थित होती.
वाहतुक नियोजन आढावा बैठकीत प्रामुख्याने मनपा हद्दीतील विविध रस्त्यांवर आवश्यकतेनुसार दिशा दर्शक फलक, गतीरोधक पट्टी, झेब्रा क्रॉसिंग इत्यादी उपाययोजना महापालिकेच्या वतीने करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. तसेच शहरात बहुतांश ठिकाणी महानगरपालिकेने नो-पार्किंग फलक लावण्यात आलेले असुन टोइंग-व्हॅन द्वारे नो पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर सुद्धा कारवाई महापालिकेमार्फत होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
त्याचप्रमाणे शहरातील ज्या रस्त्यावर दुभाजक नाहीत तो रस्ता सम-विषम पार्कंग करण्यासाठी महापालिक...



