HomeनांदेडPlantation of trees by judges in the court | हिमायतनगर येथील न्यायालय...

Plantation of trees by judges in the court | हिमायतनगर येथील न्यायालय परिसरात न्यायाधीशांच्या हस्ते वृक्षारोपण – NNL

हिमायतनगर| हिमायतनगर येथील दिवानी न्यायालयांच्या परिसरामध्ये न्यायाधीश यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले आहे. दि. २९ सोमवारी हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला.

हिमायतनगर न्यायालयाचे न्यायाधीश कि. रा. खोंद्रे यांच्या संकल्पनेतून हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम न्यायालयात दि. २९ सोमवारी सकाळी साडे अकराच्या दरम्यान पार पडला. न्यायालयांच्या परिसरात पिंपळ, वड, जांभूळ, कडुलिंब अश्या विविध गुणकारी एकूण ६३ वृक्षांची लागवड न्यायाधीश खोंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले.

IMG 20240729 165116 Plantation of trees by judges in the court | हिमायतनगर येथील न्यायालय परिसरात न्यायाधीशांच्या हस्ते वृक्षारोपण - NNL

न्यायाधीश व तालूका विधीसेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमास पोलीस निरीक्षक अमोल भगत, नायब तहसीलदार रामचंद्र ताडेवाड, विशेष सरकारी वकील अँड. श्रीमती कोरेवाड, महिला संरक्षण अधिकारी संदिप कदम, नगरपंचायतीचे ओएस महाजन, आदींसह न्यायालयीन कर्मचारी, हिमायतनगर शहरातील जेष्ठ एडवोकेट दिलीप राठोड, इतर वकील बांधव आणि पक्षकारांची प्रामूख्याने उपस्थिती होती.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments