
नांदेड| व्हॉईस ऑफ मीडिया संलग्नित साप्ताहिक विंग पत्रकार संघाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी कुलदीप सुर्यवंशी यांची तर सचिवपदी शिवराज पाटील गाडीवान यांची संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडा विभागीय अध्यक्ष अब्दुल कय्युम यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारिणी घोषित करण्यात आली.


यामध्ये नांदेडच्या जिल्हाध्यक्षपदी कुलदीप सुर्यवंशी,जिल्हा सचिव शिवराज पाटील गाडीवान,जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष शंखपाळे,जिल्हा सहसचिव मलिक चव्हाण, जिल्हा सरचिटणीस प्रितम गवाले,जिल्हा उपाध्यक्षपदी मंगेश तेलंगे यांच्यासह कार्यकारिणी सदस्य तथा जिल्हा संघटक म्हणून सुरज कौटकर ,गजानन बीडकर, कावेरी तेलंगे (श्रीमंगले),दिनेश बुजवणे,भिमराव बुक्तरे,कैलास गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे.

या निवडीबद्दल व्हॉईस ऑफ मीडिया संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष तथा वरिष्ठ पत्रकार संदीप काळे, राष्ट्रीय कार्यवाहक तथा दैनिक प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे,मराठवाडा विभागीय अध्यक्ष अब्दुल कय्युम यांच्यासह अनेकांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.





