नांदेडधार्मिक

Saai naam : पार्डी गावात १९ वर्षांची अखंड भक्तीपरंपरा : अखंड साईनाम सप्ताह व संगीतमय संतकथा सोहळा उत्साहात

हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) पार्डी (ज.) ता. बाळगंगा, जि. नांदेड येथे गेल्या १९ वर्षांपासून अविरतपणे सुरू असलेला अरविंद साईनाम सप्ताह व संगीतमय संतकथा सोहळा यंदाही मोठ्या भक्तिभावात आणि हभप.माधव महाराज बोरगडिकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडत आहे. साईभक्ती, वारकरी संप्रदायाची परंपरा, नामस्मरण आणि संतविचारांचा जागर यामुळे संपूर्ण पंचक्रोशी भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाली आहे.

या धार्मिक सोहळ्याचे आयोजन समस्त गावकरी मंडळी व बजरंग दत्त शाखा, पार्डी (ज.) यांच्या वतीने करण्यात आले असून, दि. ०१ फेब्रुवारी रोजी श्री साई मूर्ती, कलश पूजन आणि अभिषेक सोहळ्याने सुरुवात झाली असून ते ०८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज पहाटे काकडा भजन, सकाळी साईचरित्र पारायण, दुपारी संतकथा, सायंकाळी हरिपाठ, रात्री हरिकिर्तन व जागरण अशा भक्तीमय कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे.

या सप्ताहात राष्ट्रीय व राज्यस्तरीय कीर्तनकार, संतकथाकार व भजनकार आपली सेवा अर्पण करीत असून, भाविकांना संतपरंपरेचा, साईभक्तीचा आणि अध्यात्मिक विचारांचा अमूल्य ठेवा मिळत आहे. साई अभिषेक, कलशपूजन, भजन-कीर्तन, संतकथा व हरिनामाच्या गजराने पार्डी गाव भक्तीच्या नंदनवनात परिवर्तित झाले आहे.

या सोहळ्याला अनेक प्रमुख मान्यवरांची उपस्थिती लाभत असून, ह.भ.प. राम महाराज पांगरेकर, संत कथा व्यासपीठाचार्य ह.भ.प. प्रविण महाराज पार्डीकर, व्यासपीठाचार्य परमेश्वर रेड्डी तसेच विविध मान्यवर कीर्तनकार, कथाकार व संगीतकारांनी आपल्या प्रभावी वाणीतून उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध करत आहेत.

गेली १९ वर्षे अखंड सुरू असलेली ही धार्मिक परंपरा पार्डी गावाच्या सामाजिक, सांस्कृतिक व अध्यात्मिक जीवनाची ओळख बनली आहे. गावातील युवक, महिला, वृद्ध, बालगोपाल सर्वजण या सप्ताहाच्या सेवेत सहभागी होत असून, गावकऱ्यांच्या एकतेचे आणि भक्तीभावाचे हे जिवंत उदाहरण ठरत आहे.

या पवित्र सोहळ्यामुळे परिसरातील वातावरण भक्ती, शांतता आणि सद्भावनेने भारले असून, “साई राम… साई राम…” या नामघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे. हा धार्मिक कार्यक्रम दिनांक 8 फेब्रुवारी पर्यंत चालणार असून या कार्यक्रमास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भक्तीमय सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पार्डी येथील गावकरी तसेच बजरंग दल शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button