Saai naam : पार्डी गावात १९ वर्षांची अखंड भक्तीपरंपरा : अखंड साईनाम सप्ताह व संगीतमय संतकथा सोहळा उत्साहात
हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) पार्डी (ज.) ता. बाळगंगा, जि. नांदेड येथे गेल्या १९ वर्षांपासून अविरतपणे सुरू असलेला अरविंद साईनाम सप्ताह व संगीतमय संतकथा सोहळा यंदाही मोठ्या भक्तिभावात आणि हभप.माधव महाराज बोरगडिकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडत आहे. साईभक्ती, वारकरी संप्रदायाची परंपरा, नामस्मरण आणि संतविचारांचा जागर यामुळे संपूर्ण पंचक्रोशी भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाली आहे.
या धार्मिक सोहळ्याचे आयोजन समस्त गावकरी मंडळी व बजरंग दत्त शाखा, पार्डी (ज.) यांच्या वतीने करण्यात आले असून, दि. ०१ फेब्रुवारी रोजी श्री साई मूर्ती, कलश पूजन आणि अभिषेक सोहळ्याने सुरुवात झाली असून ते ०८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज पहाटे काकडा भजन, सकाळी साईचरित्र पारायण, दुपारी संतकथा, सायंकाळी हरिपाठ, रात्री हरिकिर्तन व जागरण अशा भक्तीमय कार्यक्रमांची र...
