हदगाव, शेख चांदपाशा | विधानसभा निवणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या भलत्याच कामात मश्गुल आसणारे नेते आता अँक्टिव्ह झालेले दिसु लागले आहेत. गावागावात जावून आता सर्वसामन्य नागरिका शी संपर्क करतांना दिसुन येत आहे, एरवी कधी ही सर्वसामन्या जनतेच्या व शेतक-याच्या काय ‘व्यथा आहेत. हे जाणुन घेत होते मात्र प्रशासनाकडे कृतीपेक्षा त्यांचा देखावाच जास्त दिसून येत आहे. त्यांचे काही चापलुसी करणारे काही कार्यकर्ते आमचा नेता ‘लय भारी ‘हे दाखविण्यासाठी आटापिटा करत असल्याचे सोशल मीडियावर दिसून येत आहेत.
सर्वसामान्य जनतेला व त्रस्त शेतकऱ्यांना गोड बोलून समाधान करणारे आता मात्र सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. शासकीय मदत मिळो अथवा न मिळो माञ प्रशासनाला नेहमी निवेदने देवून मीच शेतकऱ्याचा कैवारी आहे असे दाखविण्याचा प्रयत्न करताना दिसुन येत आहे. इतकेच काय त्याचे समर्थक ही आता सोशल मिडीयावर सक्रिय झाले आहे. सोशल मिडीयावर माञ आमचा नेता ‘लय पावर फुल ‘दाखविण्यासाठी मर्यादा पातळी पण ओलंडली जात असुन, शब्दांना कुठलीच मर्यादा नसल्याच दिसुन येत आहे. विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला नसला नेते मात्र विधानसभेचे उमेदवार म्हणून गुडाघ्याला बाशिंग बाधुन आगदी तयार आहेत.
उमेदवारासह त्याच्या समर्थकाच्या गाववा-या सुरु आहेत आमचा ‘नेता कसा लय भारी पावरफूल हे दाखविण्या साठी त्यांचे समर्थक सोशल मिडीयावर अँक्टिव्ह होत आहेत. माञ हदगाव विधानभा क्षेञातील जनता माञ शांत आहे. समजा ऐखाद्या उमेदवाराच्या बाबतीत कोणी सोशल मिडीयावर काँमेंट केली की लगेच विरोधी गटातील काँमेंटचा वर्षाव होतो आहे. विशेष म्हणजे काही अर्थिक परिस्थितीतने ‘गब्बर ‘आसणा-या संभव्य उमेदवार ने माञ ‘सध्या तरी ‘मौण’पाळल्याचे दिसुन येत आहे. काही आर्थिक परिस्थितीने गब्बर असलेल्या उमेदवार तयारीनिशी निवडणुकीला समोर जाण्याची बेतात आहे.