Saturday, May 16

Central Reserve Police Training College : मुदखेड येथील केंद्रीय रिजर्व पोलिस प्रशिक्षण महाविदयालयात योग शिबीराचे आयोजन

नांदेड| केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या नांदेड येथील केंद्रीय संचार ब्यूरो च्या वतीने मुदखेड येथील केंद्रीय रिजर्व पोलिस प्रशि‍क्षण महविदयालयात 11 व्या जागतिक योग दिनानिमीत्त‍ योग शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिवीरामध्ये आर्ट ऑफ लिवींगच्या योगतज्ञाच्या मार्गदर्शनाखाली योगाभ्यास घेण्यात आला.

समग्र मानवजातीच्या कल्याणासाठी, शारिरीक आरोग्य असो की मानसिक आरोग्य तसेच तनावपूर्ण जीवनात आनंद मिळवण्यासाठी निरंतर योग अभ्यास करणे, तसेच संपूर्ण जगाला योगाचे महत्व पटवून देण्यासाठी 21 जून हा दिन जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मुदखेड येथील केंद्रीय रिजर्व पोलिस बल प्रशिक्षण महाविदयालयात हजारोच्या् संख्येिने प्रशि‍क्षणार्थी संरक्षण सेवेचे प्रशि‍क्षण घेत आहेत. संरक्षण सेवेत निर्णय क्षमता बळकटीकरणासाठी योग अभ्यासाची महत्वाची भुमीका आहे. शारिरीक सुदृढतेसोबत मानसीक स्वास्थासाठी योगा आणि प्राणायामची गरज लक्षात घेऊन प्रशिक्षण घेत असलेले जवान आणि अधिका-यांसाठी या योग शिबीराचे आयोजन करण्यात आले.

IMG 20250621 WA0317 Central Reserve Police Training College : मुदखेड येथील केंद्रीय रिजर्व पोलिस प्रशिक्षण महाविदयालयात योग शिबीराचे आयोजन

मुदखेड येथील केंद्रीय रिजर्व पोलिस बलाच्या शहीद गोविंद राठोड सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या योग शिबीराचे उदघाटन केद्रीय रिजर्व पोलिस बलाचे महानिरीक्षक तथा प्रशक्षिण केंद्राचे प्राचार्य ख्वा्जा सजाउददीन, मुख्य प्रशिक्षण अधि‍कारी कमाडंट वेदप्रकाश त्रीपाठी, केंद्रीय संचार ब्यू्रोचे प्रसिध्दी प्रमुख सुमि‍त दोडल, आर्ट ऑफ लिवींगचे योग तज्ञ सायली मेनन, अॅड. गोकुळ कौडगे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.

IMG 20250621 WA0331 Central Reserve Police Training College : मुदखेड येथील केंद्रीय रिजर्व पोलिस प्रशिक्षण महाविदयालयात योग शिबीराचे आयोजन

यानंतर रिजर्व पोलि‍स बलाच्याा जवान, अधि‍कारी, कर्मचारी तसेच परिवारासाठी आयोजित योग शिबिरामध्ये आर्ट ऑफ लिवींगचे योग तज्ञ सायली मेनन, अॅड. गोकुळ कौडगे यांनी पाठीवरचे आसन, पोटावरील आसन, बैठक स्थितीतील आसन, दंड स्थितीतील आसन, प्राणायाम, ध्यान इत्यादी आसनांची प्रात्यक्षिके सादर केली, यात सूर्यनमस्कार, सर्वांगासन, नौकासन, धनुरासन, वृक्षासन, भुजंगासन इत्यादी प्रमुख आसनांचा समावेश होता. तसेच या योग शिबीरात 500 हुन अधिक अधि‍कारी, जवान आणि त्यांच्‍या परिवारांनी तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली योगासनं केली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहायक कमाडंट हरिशंकर प्रसाद यांनी केले तर या शिबीराच्या यशस्वी आयोजनासाठी सहायक कमाडंट करनजीत सिंह सुभेदार मेजर दिनेश कुमार, सहायक कमाडंट तथा चिकीत्साब अधि‍कारी डा. सी संजीवन, सहायक कमाडंट शीशीर जगताप, सहा. कमाडंट मंत्रालय उत्ताम साखरे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!