The alarm of “Vithalnama” | जून्या लोह्यात “विठ्ठलनामा” चा गजर ; शाळकरी चिमुकल्यांच्या ज्ञान दिंडीने वेधले लक्ष – NNL

लोहा| शिवछत्रपती विद्यालयाची ‘आषाढी एकादशी निमिताने विठ्ठल नामाचा जयघोष..टाळ मृदुंगाच्या गजर करत चिमुकल्या शाळकऱ्यांची ज्ञान दिंडी जुन्या शहरातील मुख्य रस्त्याने काढली..- मृदंगाचा निनाद आणि महिलांची फुगडी असो भक्तीमय वातावरण या दिंडीदरम्यान पहावयास मिळाले..संत ज्ञानोबा माऊली यांची प्रतिमा व ग्रंथ -प असलेल्या पालखीचे नागरिकांनी दर्शन घेतले.


शिवछत्रपती प्राथमिक शाळेच्या ‘आषाढी एकादशी निमित्राने जून्या शहरातून’ ग्यानवा-तुकाराम – विठ्ठलाच्या नामाचा जयघोष करत टाळ- मृदगाच्या गजरात आषाढी दिंडी काढण्यात आली. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल -रुखमाई ..वारकऱ्यांचा वेष परिधान केला होता माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक दामोदर वडजे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक एच. जी- पवार यांच्या उपस्थितीत या दिडींची सुरुवात झाली.वारक-यांच्या वेशभूषेतील विद्यार्थी डोईवर तुळस घेऊन पालखी मागे होती.

सजविलेल्या पालखीत संत ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिमा व पुस्तके होती. टाळ-मृदंग याचा निनाद करत दिंडी जून्या शहरात मुख्य रस्त्याने निघाली तेव्हा महिला पालकांनी पालखीचे दर्शन घेतले. मारोती मंदिर, संत गोरोबा काका मंदिर, भोईवाडा येथे महिलांनी फुगडी खेळत या पालखी सोहळ्यात भक्तिभावे सहभागी झाल्या.



दिंडीचे महिलांनी जोरदार स्वागत केले. जुन्या शहरात भक्तिमय वातावरण तयार झाले असे आयोजक मुख्याध्यापक हणमंत पवार यानी सांगितले. पावसाची रिपरिप असतानाही’ चिमुकल्यांचा असलेला ‘उत्साह’ या दिंडी सोहळ्याला द्विगुणित करणारा ठरला मुख्याध्यापक डी-ई- वडजे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते दिंडी सोहळ्यासाठी एस-एम-आढाव, मीनाताई कळकेकर रामेश्वर जामगे, कोमल काळबांडे, व्यंकट पवार बालकताई संगीता पवार यांनी परिश्रम घेतले. सोहळ्याला मंडळ अधिकारी प्रियंका गवते- आडगावकर यांची निशेष उपस्थिती होती.




