Thursday, May 14

Himaytnagar Mahavitaran news : अव्वाच्या सव्वा वीजबिलांनी नागरिक संतप्त, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष वामनराव पाटील यांचं अर्ध नग्न आंदोलन

हिमायतनगर, अनिल मादसवार| शहर व तालुक्यात महावितरण विभागाचा मनमानी, एकाधिकारशाही आणि अरेरावी कारभार चव्हाट्यावर आला असून, शेतकरी व सामान्य वीजग्राहक प्रचंड संतप्त झाले आहेत. शेतकऱ्यांच्या शेतात व काही ठिकाणी गावात मंजुरी न घेता अनधिकृत डीपी बसविण्याचे प्रकार सर्रास सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या सर्व प्रकारची चौकशी व्हावी आणि दोषीवर बडतर्फीची कार्यवाही करावी यासाठी हिमायतनगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी महावितरण उपविभागीय कार्यालयासमोर अर्धनग्र आंदोलन सुरू केला आहे.

नुकतेच तालुक्यातील शेतातील विहीर खोदकाम पूर्ण झालेल्या एका शेतकऱ्याच्या शेतात दुसऱ्याच दिवशी महावितरण कर्मचाऱ्यांनी परस्पर डीपी बसवली. याची शहरभर चर्चा होत असल्याने याबाबत विचारणा केली असता संबंधित कर्मचाऱ्यांनी “तुम्हाला काहीही करता येणार नाही, आम्ही आमच्या अधिकारात आहोत” अशा उद्धट व मनमानी भाषेचा वापर केल्याचा आरोप आहे. नियम, प्रक्रिया व परवानगीबाबत माहिती मागितली असता उलट धमकावण्याचा प्रकार झाल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी पसरली आहे.

IMG20260203142714 01 Himaytnagar Mahavitaran news : अव्वाच्या सव्वा वीजबिलांनी नागरिक संतप्त, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष वामनराव पाटील यांचं अर्ध नग्न आंदोलन
oplus_0

याचबरोबर हिमायतनगर शहरातील व ग्रामीण भागातील अनेक वीजग्राहकांना चुकीची मीटर रीडिंग व विनाकारण वाढीव देयके लावून मानसिक त्रास दिला जात असल्याचे चित्र आहे. तक्रारी करूनही दुर्लक्ष केले जात असल्याने महावितरण ग्राहकांना वेठीस धरत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. या गंभीर प्रकाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांना निवेदन देत तातडीने सखोल चौकशी करा, दोषी अभियंता, लाईनमन व कर्मचाऱ्यांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई करून बडतर्फ करा आणि ग्राहकांना पारदर्शक व नियमबद्ध सेवा देण्याचे आदेश देण्याची जोरदार मागणी केली आहे.

IMG20260203143510 01 Himaytnagar Mahavitaran news : अव्वाच्या सव्वा वीजबिलांनी नागरिक संतप्त, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष वामनराव पाटील यांचं अर्ध नग्न आंदोलन
oplus_0

वारंवार सूचना देऊनही सुधारणा होत नसल्यास, शासनाचे होणारे नुकसान व जनतेची लूट थांबविण्यासाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. या प्रकरणामुळे महावितरणच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

IMG20260203144125 01 Himaytnagar Mahavitaran news : अव्वाच्या सव्वा वीजबिलांनी नागरिक संतप्त, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष वामनराव पाटील यांचं अर्ध नग्न आंदोलन
oplus_0

एकूणच हिमायतनगर येथील महावितरणच्या उप कार्यकारी अभियंता कार्यालयात सुरू असलेल्या मनमानी कारभाराचे पितळे उघडे पडताचं राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी या सर्व प्रकाराच्या चौकशीच्या मागणीचे निवेदन देऊन महावितरण कार्यालयासमोर अर्ध नग्न अवस्थेत ठिय्या मांडल्या आहेत. त्यांनी सुरू केलेल्या या आंदोलनामुळे महावितरण विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांची झोप उडाली असल्याचे पहावयास मिळत आहे. आता हिमायतनगर महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता कार्यालयात सुरू असलेल्या मनमानी कारभाराची कशा प्रकारे चौकशी होते आणि शेतकऱ्यांना व वीज ग्राहकांना वेठीस धरून एकाधिकारशाही मनमानी कारभार चालवणाऱ्यांवर प्रशासन काय…? कार्यवाही करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!