“World Mosquito Day” ; ” जागतिक डास दिन ” जिल्हा हिवताप कार्यालय नांदेड येथे साजरा

IMG 20250820 WA0003 "World Mosquito Day" ; " जागतिक डास दिन " जिल्हा हिवताप कार्यालय नांदेड येथे साजरा

नांदेड l आज दि.20 ऑगस्ट रोजी ” जागतिक डास दिन ” जिल्हा हिवताप कार्यालय नांदेड येथे साजरा करण्यात आला. हिवतापाचे जनक सर रोनाल्ड रॉस हे ब्रिटिश डॉक्टर. त्यांनी त्यांच्या भारतातील वास्तव्यात हिवताप या आजारावर केलेल्या महत्वपूर्ण संशोधनामुळे ते ओळखले जातात. या संशोधनासाठी त्यांना १९०२ सालच्या नोबल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.

अनाफेलीस मादी या डासामुळेच हिवतापचा प्रादुर्भाव होऊन या डासांमुळेच हा आजार फैलावतो असा निष्कर्ष सर रोनाल्ड रॉस यांनी २० ऑगस्ट १८९७ रोजी सिद्ध केले. सर रोनाल्ड रॉस यांच्या प्रतिमेस जिल्हा हिवताप व हत्तीरोग अधिकारी नांदेड डॉ.अमृत चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण करून सर्वांनी अभिवादन केले.

या वर्षाची मुख्य संकल्पना ” हिवताप विरुद्धच्या लढाईला जगासाठी अधिक अतिगतिमान करूयात ” ही आहे. डास निर्मूलनची प्रतिज्ञा श्री व्यंकटेश पुलकंठवार आरोग्य निरीक्षक (हत्तीरोग) यांनी वाचन केली व सर्वांनी सामूहिक प्रतिज्ञा घेतली. यावेळी नांदेड जिल्हा हिवताप कार्यालय, हत्तीरोग नियंत्रण पथक येथील श्री संजय भोसले जिल्हास्तरीय आरोग्य पर्यवेक्षक, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी सतिश शिंदे, कौसले, आरोग्य निरीक्षक माधव कोल्हे, सत्यजीत टिप्रेसवार, किटक समहारक शंकर मलदोडे, लिपिक अशोक हरनाळीकर, दिलिप राठोड, बालाजी केंद्रे, वाहन चालक मुकुंद देवकांबळे, शेख खलील, भीमराव राठोड, परमेश्वर मठदेवरु, राहुल सवाचमल, मोलके आदी कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top