Friday, June 26

Tag: “World Mosquito Day” celebrated at District Health Office

“World Mosquito Day” ; ” जागतिक डास दिन ” जिल्हा हिवताप कार्यालय नांदेड येथे साजरा

“World Mosquito Day” ; ” जागतिक डास दिन ” जिल्हा हिवताप कार्यालय नांदेड येथे साजरा

नांदेड, आरोग्य
नांदेड l आज दि.20 ऑगस्ट रोजी " जागतिक डास दिन " जिल्हा हिवताप कार्यालय नांदेड येथे साजरा करण्यात आला. हिवतापाचे जनक सर रोनाल्ड रॉस हे ब्रिटिश डॉक्टर. त्यांनी त्यांच्या भारतातील वास्तव्यात हिवताप या आजारावर केलेल्या महत्वपूर्ण संशोधनामुळे ते ओळखले जातात. या संशोधनासाठी त्यांना १९०२ सालच्या नोबल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. अनाफेलीस मादी या डासामुळेच हिवतापचा प्रादुर्भाव होऊन या डासांमुळेच हा आजार फैलावतो असा निष्कर्ष सर रोनाल्ड रॉस यांनी २० ऑगस्ट १८९७ रोजी सिद्ध केले. सर रोनाल्ड रॉस यांच्या प्रतिमेस जिल्हा हिवताप व हत्तीरोग अधिकारी नांदेड डॉ.अमृत चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण करून सर्वांनी अभिवादन केले. या वर्षाची मुख्य संकल्पना " हिवताप विरुद्धच्या लढाईला जगासाठी अधिक अतिगतिमान करूयात " ही आहे. डास निर्मूलनची प्रतिज्ञा श्री व्यंकटेश पुलकंठवार आरोग्य निरीक्षक (हत्तीरोग) यांनी वाचन...
error: Content is protected !!