Thursday, May 14

Tag: by the exorbitant electricity bills

Himaytnagar Mahavitaran news : अव्वाच्या सव्वा वीजबिलांनी नागरिक संतप्त, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष वामनराव पाटील यांचं अर्ध नग्न आंदोलन

Himaytnagar Mahavitaran news : अव्वाच्या सव्वा वीजबिलांनी नागरिक संतप्त, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष वामनराव पाटील यांचं अर्ध नग्न आंदोलन

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| शहर व तालुक्यात महावितरण विभागाचा मनमानी, एकाधिकारशाही आणि अरेरावी कारभार चव्हाट्यावर आला असून, शेतकरी व सामान्य वीजग्राहक प्रचंड संतप्त झाले आहेत. शेतकऱ्यांच्या शेतात व काही ठिकाणी गावात मंजुरी न घेता अनधिकृत डीपी बसविण्याचे प्रकार सर्रास सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या सर्व प्रकारची चौकशी व्हावी आणि दोषीवर बडतर्फीची कार्यवाही करावी यासाठी हिमायतनगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी महावितरण उपविभागीय कार्यालयासमोर अर्धनग्र आंदोलन सुरू केला आहे. नुकतेच तालुक्यातील शेतातील विहीर खोदकाम पूर्ण झालेल्या एका शेतकऱ्याच्या शेतात दुसऱ्याच दिवशी महावितरण कर्मचाऱ्यांनी परस्पर डीपी बसवली. याची शहरभर चर्चा होत असल्याने याबाबत विचारणा केली असता संबंधित कर्मचाऱ्यांनी “तुम्हाला काहीही करता येणार नाही, आम्ही आमच्या अधिकारात आहोत” अश...
error: Content is protected !!