नांदेडमहाराष्ट्र

Nanded Railway Division officials’ negligence : नांदेड रेल्वे डिव्हिजन अधिकाऱ्यांचा गलथानपणा; जागेअभावी वॉटर कुलर प्रतीक्षेत

नांदेड| रेल्वे डिव्हिजन अधिकाऱ्यांचा गलथानपणाचे आणखी उदाहरण समोर आले असून, त्यांच्या विनंती वरून धर्मभूषण ऍड. दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून एक महिण्या पासून तय्यार केलेले वॉटर कुलर नांदेड रेल्वे स्थानकावर बसविण्यासाठी जागा द्यायला वेळ मिळत नसल्यामुळे दिलीप ठाकूर यांनी संताप व्यक्त केला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, साधारणत: चाळीस दिवसापूर्वी जेष्ठ समाजसेवक धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर यांना नांदेड रेल्वे डिव्हिजन च्या कमर्शीयल विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा फोन आला होता. त्यांनी फोन द्वारे विनंती केली की, नांदेड रेल्वे स्थानकावर पिण्याचे थंड पाणी मिळत नसल्यामुळे प्रवाश्यांची अडचण होत आहे. त्यासाठी आपण पाणपोई लावून सहकार्य करावे. यावर दिलीप ठाकूर यांनी असे उत्तर दिले की, तात्पुरती पाणपोई लावण्यापेक्षा कायम स्वरूपी वॉटर कुलर लावणे योग्य राहील. त्यावर त्या अधिकाऱ्याने हे तर आणखी चांगले असे सांगितले.

त्यानंतर आणखी एका वाणिज्य विभागाच्या अधिकाऱ्याचा फोन आला आणि त्यानी सांगितले की, पाण्याची अडचण असल्यामुळे वॉटर कुलर लवकरात लवकर बसवावा. यानंतर दोन दिवसात दिलीप ठाकूर यांनी नविन वॉटर कुलर विकत घेऊन तो कुठे ठेवायचा याबाबत विचारणा केली. वरिष्ठाना विचारून सांगतो असे सांगून आठ दिवसाची वेळ निघून गेली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी लेखी अर्ज देण्याची सूचना केली. दिलीप ठाकूर यांनी लेखी अर्ज देऊन एक महिना झाले तरी काहीही निरोप मिळाला नाही. याबाबत डिव्हिजन रेल्वे मॅनेजर यांच्याशी संपर्क साधण्याचा सल्ला संबधित अधिकाऱ्याने दिला. दिलीप ठाकूर यांनी डीआरएम यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या स्वीय सहाय्यक यांनी डीआरएम व्यस्त असल्याचे सांगितले.

त्यामुळे सदर प्रकरण खा. डॉ.अजित गोपछडे यांना सांगितले. त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना धारेवर धरले. दोन दिवसात जागा उपलब्ध करुन देतो असे त्यानी खासदारांना सांगितले.डीआरयुसी मेंबर अरविंद भारतीया यांनी सुद्धा प्रत्यक्ष जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली. तरी देखील काही उपयोग झाला नाही. आज दिलीप ठाकूर यांनी वाणिज्य अधिकारी यांना पुन्हा एकदा संपर्क साधला. तुम्हाला जागा उपलब्ध करता येत नसेल तर कशाला आधी मला सांगितले. त्यामुळे माझ्या पन्नास हजार रुपयाच्या वॉटर कुलरचा योग्य उपयोग होत तर नाहीच शिवाय मनस्ताप होत आहे. त्यामुळे नाईलाजास्तव मला वृतपत्राकडे जावे लागेल असे दिलीप ठाकूर यांनी सांगितले असता,त्यांनी तुम्हाला काय करायचे ते करा. यापुढे तुमचा फोन उचलणार नाही असे सांगितले.रेल्वे अधिकाऱ्यांच्या गलथान पणा मुळे दिलीप ठाकूर सारख्या जेष्ठ समाजसेवकाला जो मनस्ताप झाला आहे आणि प्रवाशांची गैरसोय झाल्याबद्दल योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी दिलीप ठाकूर यांनी रेल्वे मंत्र्याकडे केली आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button