Nanded Railway Division officials’ negligence : नांदेड रेल्वे डिव्हिजन अधिकाऱ्यांचा गलथानपणा; जागेअभावी वॉटर कुलर प्रतीक्षेत
नांदेड| रेल्वे डिव्हिजन अधिकाऱ्यांचा गलथानपणाचे आणखी उदाहरण समोर आले असून, त्यांच्या विनंती वरून धर्मभूषण ऍड. दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून एक महिण्या पासून तय्यार केलेले वॉटर कुलर नांदेड रेल्वे स्थानकावर बसविण्यासाठी जागा द्यायला वेळ मिळत नसल्यामुळे दिलीप ठाकूर यांनी संताप व्यक्त केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, साधारणत: चाळीस दिवसापूर्वी जेष्ठ समाजसेवक धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर यांना नांदेड रेल्वे डिव्हिजन च्या कमर्शीयल विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा फोन आला होता. त्यांनी फोन द्वारे विनंती केली की, नांदेड रेल्वे स्थानकावर पिण्याचे थंड पाणी मिळत नसल्यामुळे प्रवाश्यांची अडचण होत आहे. त्यासाठी आपण पाणपोई लावून सहकार्य करावे. यावर दिलीप ठाकूर यांनी असे उत्तर दिले की, तात्पुरती पाणपोई लावण्यापेक्षा कायम स्वरूपी वॉटर कुलर लावणे योग्य राहील. त्यावर त्या अधिकाऱ्याने हे तर आणखी चांगले ...
