हिमायतनगर। तालुक्यातील मौजे टेम्भुर्णी येथे एका 75 वर्षीय वृद्ध महिलेचा तोंडात कापड कोंबून तिच्याच घरात संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. गयाबाई रामजी तवर असे मयत महिलेचे नावं असून, महिलेचा खून झाला असावा अशी चर्चा होते आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे की, हिमायतनगर तालुक्यातील मौजे टेम्भुर्णी येथील महिला गयाबाई रामजी तवर / देवसरकर या आपल्या घरी एकट्याच राहत होत्या. मयत महिलेला नऊ एकर जमीन असून, स्वतःचे घर असून, तिन्हींही मुलींचे लग्न झालेले आहेत. मयत महिला हि सोमवारी बैन्केतून रक्कम आणि मुलीकडे ठेवलेले दागिने घेऊन घरी आली होती. याची खबर आसलेल्या अज्ञाताने तिच्या घरात प्रवेश करून सादर महिलेला मारहाण करून दागिने व रक्कम लंपास केली असावी असा संशय व्यक्त होत आहे.

गुरुवारी रात्रीं त्यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याने गावकऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली होती. त्यामुळे हिमायतनगर येथील पोलीस निरीक्षक पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले, पोलिसांनी मयत महिलेच्या मुलासह घराचे दार उघडताच गयाबाई यांचा मृतदेह आढळून आला.

त्यामुळे ही घटना घातपात असल्याची शंका नातेवाईकांनी व्यक्त केली होती. त्या दिशेने तपास सुरू असून, पोलिसांनी या प्रकरणी दोघा संधायितांना ताब्यात घेतले होते. या प्रकरणी पोलिसांनी दिनांक 5 रोजी महिलेच्या मृत्यू संदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद केली असली तरी महिलेला अज्ञात मारेकऱ्यांनी मारले असावे अशी चर्चा परिसरात सुरू आहे. हा पोलीस तपासाचा भाग असून, तपासात सर्व घटनेचा उलगडा होणार आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अमोल भगत यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार तपास जमादार बालाजी पाटील हे करत आहेत.
