
हिमायतनगर l हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय हिमायतनगर येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत अभ्यास केंद्राच्या केंद्र संयोजक पदी महाविद्यालयातील प्राध्यापक गुंडाळे मारोती यांची नियुक्ती करण्यात आली.


यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक विभागीय केंद्र नांदेड यांच्याकडून नियुक्ती पत्र प्राप्त झाले असून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.उज्वला सदावर्ते यांनी शाल व पुष्पहार घालून प्रा.गुंडाळे मारोती यांचे स्वागत केले .पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या तसेच सर्व प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे स्वागत केले.





