Selection category provided to 1 thousand 138 teachers : 1 हजार 138 शिक्षकांना निवड श्रेणी प्रदान -NNL

नांदेड| जिल्ह्यातील 24 वर्ष सेवा पूर्ण होऊन निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या अर्हताधारक 1 हजार 138 शिक्षकांना निवड श्रेणी प्रदान करण्यात आली आहे. नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल आणि प्राथमिक शिक्षण अधिकारी डॉ सविता बिरगे यांनी या कामी पुढाकार घेतल्यामुळे शिक्षकांना निवड श्रेणी प्रदान करणे शक्य झाले.

चटोपाध्याय आयोगाच्या शिफारशीनुसार वरिष्ठ श्रेणीतील 12 वर्षाच्या अहर्ताकरी सलग सेवेनंतर निवड श्रेणी लागू करण्यात येते. निवड श्रेणी मिळण्यासाठी संबंधित शिक्षकांनी वरिष्ठ वेतनश्रेणीत 12 वर्षाची सेवा पूर्ण केली असली पाहिजे, सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केले पाहिजे, प्राथमिक शिक्षकांनी प्रशिक्षित पदवीधराची पात्रता धारण केली पाहिजे. यासाठी 2 हजार 753 प्रस्ताव कार्यालयास प्राप्त झाले होते.

त्यापैकी 476 प्रस्ताव अपात्र ठरले असून 1 हजार 138 यासाठी पात्र झाले आहेत. उपलब्ध 1 जानेवारी 1986 ते 1995- 96 पर्यंत चट्टोपाध्याय प्रदान केलेल्या शिक्षकांतून निवड श्रेणी देण्यात आलेली आहे. ही निवड श्रेणी त्या त्या संवर्गातील वरिष्ठ सेवेतील 20% पदांना सेवा जेष्ठतेनुसार देय असते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button