HomeBlogAnnapurna Yojana ; मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेतील लाभार्थ्यांनी ई-केवायसी करुन घेण्याचे आवाहन -...

Annapurna Yojana ; मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेतील लाभार्थ्यांनी ई-केवायसी करुन घेण्याचे आवाहन – NNL

नांदेड | मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या योजनेमध्ये लाभार्थ्यांना 3 गॅस सिलेंडरचे पुर्नभरण मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने या योजनेत लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी ई-केवायसी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना समितीचे अध्यक्ष अभिजीत राऊत यांनी केले आहे.

विषेशत: उज्ज्वला गॅस जोडणी व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेततील महिला लाभार्थ्यांनी ई-केवायसी करुन घेणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित तेल कंपनीचे प्रतिनिधी आपल्या गावात येऊन ई-केवायसी करुन घेतील किंवा आपणास शक्य असल्यास संबंधित ऑईल कंपनीच्या एजन्सीमध्ये जाऊन ई-केवायसी करुन घ्यावी. सर्व लाभार्थ्यांनी ई-केवायसी केल्याशिवाय त्यांना या योजनेचा लाभ देता येणार नाही असेही आवाहन करण्यात आले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments