नांदेडमहाराष्ट्र

nationwide doctors’ strike : डॉक्टरांच्या देशव्यापी बंदला हिमायतनगरात उत्स्फूर्त प्रतिसाद; दिलं प्रशासनाला मागणीचे निवेदन -NNL

हिमायतनगर,अनिल मादसवार| कोलकाता येथील महिला डॉक्टरवर झालेल्या अमानुष कृत्य व हत्येच्या निषेध करण्यासाठी हिमायतनगर येथील डॉक्टर असोशियनच्या वतीने देशव्यापी बंदमध्ये सहभाग घेतला. येथील श्री परमेश्वर मंदिर परिसरात काळ्या फिती लावून निषेध करत दिवसभर शहर व तालुक्यातील रुग्णालय उघडणार नाहीत अश्या संदर्भाचे निवेदन पोलीस निरीक्षक अमोल भगत याना दिले आहे. यावेळी डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ राजेंद्र वानखेडे व सर्व डॉक्टर महिला – पुरुष मंडळी उपस्थित होती. तर या बंदला केमिस्ट अँड ड्रगीस्ट मेडिकल असोसिएशन यांनीं पाठींबा दिला आहे.

IMG 20240817 114655 nationwide doctors' strike : डॉक्टरांच्या देशव्यापी बंदला हिमायतनगरात उत्स्फूर्त प्रतिसाद; दिलं प्रशासनाला मागणीचे निवेदन -NNL

कोलकता येथील महिला डॉक्टरावर झालेल्या अमानुष अत्याचारामुळे संपूर्ण समाज मन सुन्न झाले आहे. तसेच रुग्णालयावर हल्ला करण्यात आला आणि तोडफोड करण्यात आली. या घटनेचे देशभरात तीव्र फडसाद उमटले असून, घटनेच्या निषेधार्थ हिमायतनगर शहर व तालुक्यातील डॉक्टरांनी देशव्यापी बंद मध्ये सहभाग नोंदविला आहे. त्यामुळे रुग्णांना रुग्ण सेवेअभावी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार असल्याने अतिगंभीर रुग्णांना सेवा द्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी करुन शहरातील कोणत्याही डॉक्टरांना कधीही अडचण आल्यास पूर्णतः सुरक्षा देऊ असे आश्वासन दिले आहे.

IMG 20240817 113211 nationwide doctors' strike : डॉक्टरांच्या देशव्यापी बंदला हिमायतनगरात उत्स्फूर्त प्रतिसाद; दिलं प्रशासनाला मागणीचे निवेदन -NNL

यावेळी अध्यक्ष डॉ राजेंद्र वानखेडे, डॉ.दिगंबरराव डोंगरगावकर, डॉ.दामोधर राठोड, डॉ.आनंद माने, डॉ. गायकवाड, डॉ.गणेश कदम, डॉ.लखपत्रेवार, डॉ.चव्हाण मैडम, डॉ दिलीप माने, डॉ.दिगंबर वानखेडे, डॉ.भिसे, डॉ.रावते, डॉ.ढगे, डॉ.वाळके, तसेच केमिस्ट अँड ड्रगीस्ट मेडिकल असोसिएशनचे शंकर वानखेडे, अमोल पेन्शनवार, आदींसह शहरातील व ग्रामीण भागातील सर्व डॉक्टर व मेडिकल चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

IMG 20240817 110122 nationwide doctors' strike : डॉक्टरांच्या देशव्यापी बंदला हिमायतनगरात उत्स्फूर्त प्रतिसाद; दिलं प्रशासनाला मागणीचे निवेदन -NNL

IMG 20240817 114433 nationwide doctors' strike : डॉक्टरांच्या देशव्यापी बंदला हिमायतनगरात उत्स्फूर्त प्रतिसाद; दिलं प्रशासनाला मागणीचे निवेदन -NNL

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!