नांदेडराजकीय

CIDCO ; सिडको परिसरा लगत असलेल्या ऑईल मिल मधील ‌काळी राख तात्काळ थांबावा

नवीन नांदेड l नवीन नांदेड शहरा‌ लगत असलेल्या सिडको औद्योगिक वसाहतीतील कार्यरत असलेल्या अनेक ऑइल मिल मधून निघालेली काळी राख सिडको हडको परीसरात हवेच्या माध्यमातून पसरल्या मुळे परिसरातील नागरिकांनी अनेक आरोग्य विषयक समस्या तोंड द्यावे लागत आहे.

संबंधीत प्रदुषण विभागाने तात्काळ कार्यवाही करून परिसरात येणारी काळी राख बंदोबस्त करावा‌ अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे दक्षिण जिल्हाप्रमुख विनय पाटील गिरडे यांनी केली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून सिडको हडको परीसरा लगत असलेल्या औधौगिक वसाहतीतील कार्यरत असलेल्या अनेक ऑईल मिल कारखाने असून दरवर्षी सिडको हडको परिसरातील अनेकांच्या निवासस्थानी छतावर, अंगणात, चारचाकी, दुचाकी वाहनांवर मोठ्या प्रमाणात काळी राख मोठ्या प्रमाणात साचत आहे तर सकाळी फिरणाऱ्या अनेक जेष्ठ नागरिक युवक यांच्ये नाकात , डोळ्यात,जात असल्याने आरोग्य धोक्यात आले.

असून या काळया राखेची योग्य ती विल्हेवाट लाववी व सिडको हडको परीसरातील नागरीकांना या त्रास पासून मुक्त करावे अन्यथा शिवसेना स्टाईलने संबंधीत विभागाला व परिसरातील असणाऱ्या कारखाना दारांना उत्तर देऊ असा ईशारा शिवसेना जिल्हाप्रमुख विनय पाटील गिरडे यांनी दिला आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button