नवीन नांदेड l शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख सुहास पाटील खराणे यांनी पूरग्रस्त बांधीत वसरणी येथील पंचवटी व शंकरनगर भागातील नागरीकांना अन्नधान्य किट वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासणारे कार्य केले आहे.


नावा मनपाच्या हद्दीत असलेल्या गोदावरी नंदीच्या पात्रालगत असलेल्या पंचवटी व शंकरनगर भागात गोदावरी नदी आलेल्या पुरामुळे पंचवटी व शंकरनगर भागातील अनेक निवासस्थानी पाणीच पाणी झाल्याने जिवनाशयक वस्तू सह संसार उपयोगी वस्तूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते,तर निवासस्थानी शिरलेले पाणी तिनं ते चार दिवस राहिल्याने नागरीकांना मनपाच्या वतीने राहण्याची व झोपण्याची व्यवस्था करण्यात आली होती.


शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिव सेनेचे उपनेते आमदार हेमंत पाटील यांच्या आदेशानुसार नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार आनंदराव पाटील बोढारकर व नांदेड दक्षिण जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे, तालुका प्रमुख उध्दव पाटील शिंदे यांच्या सहकार्याने शिवसेना शहरप्रमुख सुहास पाटील खराणे यांनी पंचवटी व शंकरनगर वसरणी भागातील पुरग्रस्त बांधीत नागरीक महिलांना 4 ऑक्टोबर रोजी रामराव पाटील बोढांरकर,राज पाटील बोढारकर यांच्या उपस्थितीत अन्नधान्य किटचे वाटप जवळपास पन्नास नागरीकांना करण्यात आले, शिवसेना शिंदे गटाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासत केलेले हे कार्य उल्लेखनीय असल्याचे सांगितले..




