नांदेडमहाराष्ट्र

Mahavitaran : महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसऱ्या दिवशी अर्धनग्न आंदोलन सुरु

हिमायतनगर,अनिल मादसवार | महावितरण विभागाच्या मनमानी व एकाधिकारशाही कारभाराच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी मंगळवारी दुपारपासून महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन सुरू केले आहे.

कडाक्याच्या थंडीतही हे आंदोलन सलग दुसऱ्या दिवशी सुरूच असून, 24 तास पूर्ण झाल्यानंतर या आंदोलनाचे रूपांतर आता आमरण उपोषणात करण्यात येणार आसल्याची माहिती वडगावकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

वीज ग्राहकांच्या बिलांमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत, अनाधिकृत डीपी (डिस्ट्रिब्युशन पॅनल) बसविणे, तसेच वीज ग्राहकांकडून वसूल केलेली देयके महावितरणकडे न भरता स्वतःच्या फायद्यासाठी वापरून ग्राहक व विभागाची दिशाभूल केल्याचे गंभीर आरोप यावेळी करण्यात आले. या सर्व प्रकारांमुळे सामान्य वीज ग्राहक आर्थिक व मानसिक त्रास सहन करत असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान वसुलीचे देयके स्वतःजवळ ठेऊन वापरणाऱ्यानी आंदोलनाच्या धास्तीने रक्कम जमा केली असल्याचे सांगितले जात आहे. परंत्तू तीन महिने रक्कम वापरून केलेल्या गैरप्रकाराबाबत काय..? कार्यवाही होणार हे गुलदस्त्यात आहे. एकूणच सुरु असलेल्या या आंदोलनाला नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत असून, अनेकांनी आंदोलनस्थळी भेट देत समर्थन जाहीर केले आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा ठाम इशारा वामनराव पाटील वडगावकर यांनी दिला आहे.

oplus_0

हिमायतनगर महावितरण विभागाअंतर्गत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला कथित गैरकारभार या आंदोलनामुळे चव्हाट्यावर आला असून, यास जबाबदार असलेल्या मागील व सध्याच्या सर्व अभियंते, लाईनमन व कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई व बडतर्फी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे. दरम्यान, महावितरण प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसून, या आंदोलनाकडे जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक वर्तुळाचे लक्ष वेधले गेले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button