Mahashivratri : महाशिवरात्रीला हिमायतनगरात भक्तीचा महासागर; भगवी पताका व पुरणपोळीच्या नैवेद्याने पारंपरिक सोहळा संपन्न

हिमायतनगर (अनिल मादसवार) महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर हिमायतनगर (वाढोणा) येथील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिर येथे लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. नवसाला पावणारा जागृत देव म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री परमेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांना दोन ते अडीच तास रांगेत उभे राहावे लागले. रात्री 11 वाजेपर्यंत दर्शन रांग सुरूच होती.

Oplus_16908288

महाशिवरात्रीच्या दिवशी भाविकांनी पारण्याचा उपवास धरून रात्रभर जागरण केले. मध्यरात्री वतनदारांच्या पूजेनंतर श्री परमेश्वराचा अभिषेक, महाआरती तहसीलदार सौ. पल्लवी टेमकर यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यानंतर श्री परमेश्वराचा भव्य अलंकार सोहळा पार पडला. सोने–चांदीचे अलंकार, चंद्रहार, नेकलेस, बहुपदरी हार, बाजूबंद, कर्णकुंडले आदी आभूषणांनी श्रीची मूर्ती सुवर्णकार बाबुराव सकवान यांच्या हस्ते सजविण्यात आली. हा अलंकार सोहळा तहसीलदार व मंदिर विश्वस्तांच्या उपस्थितीत पहाटे तीन वाजता विधिवत संपन्न झाला.

oplus_0

महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पहाटे शेकडो वर्षांची परंपरा जपत भगवी पताका महादेवाला अर्पण करण्यात आली. पुरोहित कांतागुरू वाळके यांच्या हस्ते श्री परमेश्वराला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. त्यानंतर पारंपरिक विधीनुसार भाविकांनी पारण्याचा उपवास सोडला. ज्येष्ठ जाणकारांच्या मते, ही परंपरा आनंदीकालापासून सुरू असून श्रद्धा, संयम व भक्तीचे प्रतीक मानली जाते. या दिवशी अलंकारमय श्रींचे दर्शन घेतल्यास मनोकामना पूर्ण होते, अशी भाविकांची दृढ श्रद्धा आहे.

oplus_0

उत्सवकाळात भाविकांच्या सेवेसाठी विविध सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला. हिमायतनगर बजरंग दलातर्फे दूध वाटप, बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, मार्कंडेय बँक व मराठवाडा ग्रामीण बँकेतर्फे साबुदाणा फराळ, विश्वकर्मा सुतार कारागीर संघटनेतर्फे केळी व पेयजलाचे वितरण करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांनीही नायलॉन साबुदाणा पाकिटांचे वाटप करून सेवाभाव जपला.

oplus_0

या उपक्रमांचा शुभारंभ मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, सेक्रेटरी अनंता देवकते यांच्या हस्ते झाला. उत्सव काळात भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता. मंदिर प्रशासन, स्वयंसेवक व ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे दर्शन व्यवस्था सुरळीत पार पडली.

oplus_0

“हर हर महादेव… परमेश्वर भगवान की जय!”च्या गगनभेदी जयघोषात संपूर्ण हिमायतनगर भक्तीमय झाले असून, महाशिवरात्रीच्या निमित्ताने धार्मिक परंपरा, सामाजिक एकता व सेवाभावाचे प्रभावी दर्शन घडले. एकूणच महाशिवरात्रीच्या निमित्ताने धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक वारसा जपणारा हिमायतनगरातील श्री परमेश्वर मंदिर उत्सव, परंपरा व भाविकांच्या श्रद्धेचे दर्शन घडवतो असे अनेकांनी सांगितलं .

oplus_0

महाशिवरात्री उत्सावास नगराध्यक्ष रफिक सेठ, उपनगराध्यक्ष विनोद गुंडेवार, सभापती जनार्धन ताडेवाड, तालुकाध्यक्ष गजानन सूर्यवंशी, सुभाष शिंदे, प्रवीण कोमावार, माजी नगराध्यक्ष अखिल भाई, मंदिराचे संचालक श्रीमती लताताई पाध्ये, श्रीमती मथुराबाई भोयर, सौ. लताताई मुलंगे, राजाराम बलपेलवाड, प्रकाश शिंदे, वामनराव बनसोडे, ऍड दिलीप राठोड, अनिल मादसवार, संजय माने, विलास वानखेडे, गजानन मुत्तलवाड, माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, नगरसेवक डॉ राजेंद्र वानखेडे, नगरसेवक आशिष सकवान, नगरसेवक सुभाष बल्पेलवाड, नगरसेवक विठ्ठल ठाकरे, मारोती हेंद्रे, राम नरवाडे, रामराव सूर्यवंशी, राजू गाजेवार, गजानन चायल, विपुल दंडेवाड, परमेश्वर काळे, सुभाष पाटील, संतोष गाजेवार, ज्ञानेश्वर शिंदे, गोविंद बंडेवार, मारोती लुमदे, नारायण माने, उदय देशपांडे, पापा पार्डीकर, कल्याण ठाकूर, दुर्गेश मंडोजवार, सतीश गोपतवाड, बंटी गुड्डेटवार, पंडित ढोणे, यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button