Homeकृषीaward for outstanding agricultural farmer ; ह.भ.प.रामराव माने उत्कृष्ट शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराने...

award for outstanding agricultural farmer ; ह.भ.प.रामराव माने उत्कृष्ट शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराने सन्मानित – NNL

award

हिमायतनगर वा.| तालुक्यातील पोटा बु येथील सधन शेतकरी ह.भ.प.रामराव संभाजी माने हे गेली चार दशका पासून उत्तम शेती करतात शेती सारख्या एकमेव उत्पन्नावर त्यातून त्यांनी परिवारातील एक माध्यमिक शिक्षक, एक कृषी अधिकारी तर एका सुनाबाईला विक्री कर निरीक्षक बनविले असून गाव आणि परिसरात त्यांच्या परिवाराची एक सधन त्याचं बरोबर संस्कारीत, धार्मिक, परोपकारी कुटुंब म्हणून ओळख आहे.अशा शेतीनिष्ठ शेतकऱ्यांचा परवाच कुणबी मराठा संघा कडून समाजसेवक तथा उत्कृष्ट शेतीनिष्ठ शेतकरी म्हणून सपत्नीक पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले.

पोटा बु येथील रामराव संभाजी माने हे लहानपणापासून शेती करीत आले. घरी वडिलोपार्जित चांगली शेती असल्याने त्याचं मन त्यात रमल आणि काळानुसार त्यात नवनवीन अपेक्षित बदल करून ,आधुनिक औजार, तंत्रज्ञान त्याचं बरोबर शेणखताचा जास्त वापर करत या जोरावर उत्तम शेती करून आपल्या उत्पन्नात त्यांनी लक्ष गाठलं त्यामुळेच आपल्या संयुक्त कुटूंबाचा डोलारा अगदी सहज पेलाला.रात्रंदिवस मेहनत योग्य नियोजन आणि त्याला सार्थ साथ त्यांच्या अर्ध्यागिनी सौ. शांताबाई रामाराव माने लाभली त्यामुळे छोटा भाऊ माध्यमिक मुख्यध्यापक,मोठा मुलगा तालूका कृषिधिकारी, तर सुनबाई विक्रीकर निरीक्षक पदापर्यंत मजल मारू शकले.

अशा या समाजातील रत्नाची पारख कुणबी मराठा महासंघ यांनी घेऊन यांचा आदर्श समाजातील इतर लोकांनी घेऊन आदर्श कुटुंब काय असते याचे उदाहरण समजपुढे ठेवून अशा व्यक्तीचा सन्मान व्हावा या हेतूने त्यांना नांदेड येथील कुणबी मराठा स्नेहमिलन सोहळ्यात भक्ती लॉन्स येथे माजी खासदार भावना गवळी, प्रदेशाध्यक्ष गिरीश जाधव, त्याचं बरोबर सत्कारमूर्ती व्यंकटेश जाधव, डॉ. राजेंद्र वानखेडे, गजानन सूर्यवंशी यांच्या हस्ते सहकुटुंब यांचा सन्मानपत्र, ट्रॉफी देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी गावातली दत्ता पवार, गजानन माने, गणेश माने बालाजी माने, तुकाराम गायके, संतोष पवळे , रामराव जाधव आबाराव माने, उत्तमराव माने, कृषी अधिकारी पुंडलिक माने व ज्ञानेश्वर माने हे उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments