हिंगोली। येथील नाईक हॉस्पिटलचे संचालक डॉ. रमेश मस्के नाईक यांचे ज्येष्ठ बंधू स्व. कालिदास मस्के नाईक (अण्णा )यांचे १४ वे पुण्यस्मरण हे विविध उपक्रम राबविण्यात आले स्वर्गीय कालिदास यांचे लहान बंधू डॉ. रमेश मस्के नाईक हे मागील तेरा वर्षांपासून पुण्यतिथीच्या दिवशी नाईक हॉस्पिटल हिंगोली येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करत असतात.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्व.कालिदास मस्के यांच्या पुण्यतिथी निमित्ताने भव्य आरोग्य तपासणी शिबीराचे व रक्तदान शिबिराचे आयोजन करून गरजू रुग्णांना विनामूल्य आरोग्य सेवा उपलब्ध करून देत स्व.कालिदास मस्के यांनी आम्हा भावंडास दिलेले प्रेम आणि आर्शिवाद या परोपकारी भावनेतनू आम्ही हे वेगवेगळी उपक्रम राबवून हा दिवस साजरा करीत असतो अशी प्रतिक्रिया डॉ.रमेश मस्के नाईक यांनी या प्रसंगी दिली.
पुण्यतिथी निमित्ताने यावर्षी आरोग्य व रक्तदान शिबीरासोबत लेखक श्री सतीश सातोनकर लिखित कै. शिवाजीराव देशमुख यांचे जीवन चरित्र रेखाटणारे “यशवंत शिवाजी” तसेच मराठवाडा आणि विशेषतः कळमनुरी विभागातील शिवसेनेचा जन्म आणि तेथील कार्य यावर लिहिलेले “गोफण गुंडा” हे पुस्तक वाटप करण्यात आले. या आरोग्य शिबिराचा अनेक रुग्णांनी लाभ घेतला अशी माहीती आयोजक डॉ. रमेश मस्के नाईक यांनी यावेळी दिली.