क्राईमनांदेड

Seize illegal sand in Parva Khu : हिमायतनगर तालुक्यातील पारवा खु शिवारातील अवैध रेती जप्त करून संबंधितावर कार्यवाही करा

नांदेड| जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील एकही रेती घाटाचा लिलाव झाला नसताना मोठ्या प्रमाणावर पारवा खु. शिवारातील एका शेतात अवैध रेतीचा साठा करून शासनाला चुना लावण्याचा प्रकार होत असून, या दात्यावर धडक कार्यवाही करवून साठा जप्त करून संबंधितांवर दंडात्मक कार्यवाही करावी अशी मागणी तक्रारदार रामराव शेषराव बंडे, रा. जवळगाव ता. हिमायतनगर, जि. नांदेड यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्याकडे दिनांक ०३/०४/२०२५ रोजी केली मात्र अद्यापही याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.

नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात कुठल्याच नदी नाल्याच्या रेती घाटाचा लिलाव झाला नाही. असे असताना हिमायतनगर महसूलच्या नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व संबंधित सज्जाच्या तलाठ्याला हाताशी धरून बेसुमार रेतीचे उत्खनन करून काळा बाजार केला जात आहे. तर अनेक ठिकाणी रानावनात व शेतात मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा करून गुत्तेदार रेती माफियांच्या मदतीने शासनाला चुना लावत आहेत. त्यामुळे गोगरीब घरकुल लाभधारकांना वाळू उपलब्ध होत नसल्याने घरकुलाचे कामे रेती अभावी अर्धवट अवस्थेत दिसून येत आहेत.

IMG 20250408 WA0011 Seize illegal sand in Parva Khu : हिमायतनगर तालुक्यातील पारवा खु शिवारातील अवैध रेती जप्त करून संबंधितावर कार्यवाही करा

असाच प्रकार हिमायतनगर तालुक्यातील विल्सन, कामारी, पिंपरी परिसरात होत असून, पैनगंगा नदीच्या पाठवून रात्रंदिवस मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा करून रेतीचा काळा बाजार केला जात आहे. तर काही ठिकाणी सुरू असलेल्या विविध शासकीय विकास कामासाठी संबंधित गुत्तेदाराकडून वाळूची साठेंबाजी करून शासनाला चुना लावला जात आहे. हिमायतनगर तालुक्यातील मौजे पारवा खु. शिवारात एका गुतेदाराने पैनगंगा नदिच्या बोरी, पिपरी, दिघी, कामारी येथील क्याड मधुन (रेती घाटावरून) अवैद्य रित्या रात्री बेरात्री रेती उपसा करून सुरेश शंकरराव जाधव यांच्या शेतात शेतकऱ्यास कोणतीही सूचना न देता जवळपास १५० ब्रास रेतीसाठा केला असल्याचे देण्यात आलेल्या तक्रारीत म्हंटले आहे.

IMG 20250408 WA0015 Seize illegal sand in Parva Khu : हिमायतनगर तालुक्यातील पारवा खु शिवारातील अवैध रेती जप्त करून संबंधितावर कार्यवाही करा

हिमायतनगर तौलुक्यातील एकही रेती घाटाचा लिलाव झाला नसताना एवढ्‌या मोठ्या प्रमाणात रेतीसाठा करून शासनाचा लाखो रुपयाचा महसुल बुडतांना या भागातील मंडळ अधिकारी, तलाठी, तहसिलदार याच पथक कुठे झोप काढत आहेत. हे कळायला मार्ग नाही, असे तक्रारकर्ते रामराव शेषराव बंडे, रा. जवळगाव ता. हिमायतनगर, जि. नांदेड मो 9579174019 यांनी निवेदनात म्हंटले असून, जिल्हाधिकारी महोदयांनी सदरील रेतीचा साठा तात्काळ जप्त करून संबंधीत मंडळ अधिकारी तलाठी यांना शासनाच्या महसूल बुडविल्या प्रकरणी जवाबदार धरून त्याचेवर कारवाई करावी.

IMG 20250408 WA0018 Seize illegal sand in Parva Khu : हिमायतनगर तालुक्यातील पारवा खु शिवारातील अवैध रेती जप्त करून संबंधितावर कार्यवाही करा

ज्या ठेकेदाराने विकास कामासाठी चोरीच्या वाळूचा साठा केला त्यांचे नाव काळ्या यादीत टाकून परवाना रद्द करावा. रेती उपास करून साठा करण्यासाठी सहकार्य करणारे वाहनधारक, रेती माफियांच्या विरोधात कठोर पाऊले उचलून पैनगंगा नदीकाठातून रेती उपास झालेल्या ठिकाणी एटीएस पथकामार्फत मोजणी करून कार्यवाही करावी जेणेकरून पुन्हा शासनाच्या महसुलाची चोरी करण्याची व अवैद्य साठा करण्याची हिम्मत कुणी करणार नाही अशी मागणी तक्रारकर्ते रामराव शेषराव बंडे यांनी पत्रकारांशी निवेदनाची प्रत देऊन बोलताना केली आहे.

IMG 20250408 WA0017 Seize illegal sand in Parva Khu : हिमायतनगर तालुक्यातील पारवा खु शिवारातील अवैध रेती जप्त करून संबंधितावर कार्यवाही करा

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!