HomeनांदेडBlood donation camp : श्रीराम नवमीनिमित्ताने रक्तदान शिबीर संपन्न - अशोक चव्हाण...

Blood donation camp : श्रीराम नवमीनिमित्ताने रक्तदान शिबीर संपन्न – अशोक चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन

नांदेड| येथील मगनपुरा भागातील सामाजिक कार्यकर्त्या सौ. सदिच्छा सोनी पाटील व मातोश्री प्रतिष्ठाण च्या वतीने श्रीराम नवमी निमित्ताने आनंदनगर येथे रविवार. दि.६ एप्रिल रोजी आयोजित रक्तदान शिबीर व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री तथ खा.अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्यासमवेत खा.डॉ. अजित गोपछडे, भाजपाचे महामंत्री संजय कौडगे, जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे , माजी महानगर जिल्हाध्यक्ष प्रविण साले , माजी स्थायी समिती सभापती किशोर स्वामी, डॉ.सचिन उमरेकर यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

IMG 20250407 WA0028 Blood donation camp : श्रीराम नवमीनिमित्ताने रक्तदान शिबीर संपन्न - अशोक चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन

यावेळी आयोजित रक्तदान शिबीराचा शुभारंभ खा.अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाल्यानंतर त्यांनी प्रभू श्रीरामचंद्राच्या प्रतिमेचे पूजन केले त्यानंतर सौ.सदिच्छा सोनी पाटील यांच्या सामाजिक कार्याची माहीती घेऊन त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्‍्छा दिल्या तसेच सदरील रक्तदान शिबीरात २०० पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून ऐन उन्हाळ्यात रक्तदान शिबीरास उदंड प्रतिसाद देत शिबीर यशस्वीपणे पार पाडले.

IMG 20250407 WA0030 Blood donation camp : श्रीराम नवमीनिमित्ताने रक्तदान शिबीर संपन्न - अशोक चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन

महारक्तदान शिबिर व महाप्रसाद वाटप कार्यक्रमास मातोश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोपान पाटील नेव्हल, तानाजी पाटील, यांचे विशेष सहकार्य लाभले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मगनपुरा मित्रमंडळाचे नितीन इंगळे पाटील, गजानन कर्ले, भास्कर पाटील शिंदे,रमेश वानखेडे, शक्तीसिंह ठाकूर, विशाल राऊतखेडकर, विशाल कंधारे, दिपक स्वामी, रवि गारोळे, किशोर बोंढारे स.जसपालसिंग कोल्हापुरे , प्रशांत अंकराला, आशुतोष जोशी , डॉ.नागेश कल्याणकर , डॉ.कुमार निवळीकर यांच्यासह वसंतनगर,बाबानगर,शाहूनगर प्रभागातील युवकांनी परिश्रम घेतले

सामाजिक जाणिवेतून महारक्तदान शिबीराचे आयोजन ..सौ. सोनी
उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि तापमानामुळे लोक रक्तदान करण्यासाठी कमी प्रमाणात पुढे येतात, ज्यामुळे रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा कमी होतो , रक्ताचा तुटवडा झाल्यास, रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध होत नाही, ज्यामुळे त्यांच्यावर वाईट परिणाम होऊ शकतो एंकदरीत उन्हाळ्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेत एक सामाजिक जाणिवेतून आपण श्रीराम नवमीच्या प्रसंगी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते या शिबीरात २०० पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून शिबीर यशस्वी पणे पार पाडले याबद्दल सर्व रक्तदात्यांचे आभार सौ.सदिच्छा सोनी पाटील यांनी शेवटी व्यक्त केले

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments