Friday, May 15

Tag: On the occasion of Shri Ram Navami

Blood donation camp : श्रीराम नवमीनिमित्ताने रक्तदान शिबीर संपन्न – अशोक चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन

Blood donation camp : श्रीराम नवमीनिमित्ताने रक्तदान शिबीर संपन्न – अशोक चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| येथील मगनपुरा भागातील सामाजिक कार्यकर्त्या सौ. सदिच्छा सोनी पाटील व मातोश्री प्रतिष्ठाण च्या वतीने श्रीराम नवमी निमित्ताने आनंदनगर येथे रविवार. दि.६ एप्रिल रोजी आयोजित रक्तदान शिबीर व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री तथ खा.अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्यासमवेत खा.डॉ. अजित गोपछडे, भाजपाचे महामंत्री संजय कौडगे, जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे , माजी महानगर जिल्हाध्यक्ष प्रविण साले , माजी स्थायी समिती सभापती किशोर स्वामी, डॉ.सचिन उमरेकर यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आयोजित रक्तदान शिबीराचा शुभारंभ खा.अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाल्यानंतर त्यांनी प्रभू श्रीरामचंद्राच्या प्रतिमेचे पूजन केले त्यानंतर सौ.सदिच्छा सोनी पाटील यांच्या सामाजिक कार्याची माहीती घेऊन त्यांचे अभिनंदन ...
Ramnavmi mla bhimrao keram ; श्रीराम नवमी निमित्त आमदार भीमराव केराम यांनी प्रभू श्रीराम मंदिरात केली महापूजा

Ramnavmi mla bhimrao keram ; श्रीराम नवमी निमित्त आमदार भीमराव केराम यांनी प्रभू श्रीराम मंदिरात केली महापूजा

नांदेड, राजकीय
किनवट,परमेश्वर पेशवे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी किनवट व गोकुंदा शहरात प्रभू श्रीराम नवमी जन्मोत्सव सोहळा अत्यंत उत्साहात व भक्तीमय वातावरणात मर्यादा पुरुषोत्तम जय श्री रामाचा जयघोष करत, गजरात साजरा करण्यात आला. परिणामी अवघी किनवट नगरी दणाणली होती. भगव्या पताका, भगव्या झेंड्यांनी अवघे शहर भव्यमय झाले होते. दरम्यान शहरातील रामनगर येथील श्रीराम मंदिरात लोकनेते आमदार भीमराव केराम यांनी श्रद्धा भावाने प्रभू श्री रामाची पूजा केली. सकाळपासूनच प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी मंदिरात भक्तांची रांग लागली होती. मतदारसंघातील सर्व पक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच तालुक्यातील रामभक्तांनी श्रीराम भक्त मंदिरात दर्शनासाठी हजेरी लावल्याचे दिसून आले. दरम्यान महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. विशेष म्हणजे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तालुक्यातील मुस्लिम समाजातील युवा नेतृत्व मुसाखान यांनी बुंदी...
error: Content is protected !!