श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| माहूर महसूल प्रशासनानी अवैध वाळू उपस्याकडे लक्ष घालून वाळू साट्यावर छापे मारुण व अवैध वाळू वाहतुकीच्या मुख्य रस्त्यावर खंदक खोदून कार्यवाही करीत अवैध वाळूवर नियंत्रण ठेवण्यासाठी पावले उचले असलेतरी यात माञ त्यांना पाहिजे तसे यश मिळत नसल्याचे पहावयास मिळत आहे.
तालुक्यातील मौजे वडसा येथील नागोबा पेंडातून मोठ्या प्रमाणात अवैध मार्गाने वाळु विक्रीचा गोरख धंधा आजघडीला राजरोषपणे सुरूच आहे. आणि मुख्यतः वडसा व नागोबा मंदीराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वाळूची डंपिंग केली जात आहे.ही वाळू पैनगंगा नदीच्या पात्रातून अवैध मार्गाने उपसा करून विविध ठिकाणी साठवन केली जात आहे. जेसीबीच्या माध्यमातून टिप्पर व हैवा ट्रक मध्ये भरून त्याची वाहतूक विदर्भासह किनवट-माहूर तालुक्यातील काणाकोपर्याच्या ठिकाणी केली जात आहे.असे असले तरी महसूल व पोलीस प्रशासनाला का दिसत नाही ? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.
निवडणुकीच्या आधी वाळु उपसा रात्रीलाच व्हायचा परंतु मागील आठवड्यापासून दिवसाला सुद्धा मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्र आहे. आणि या अवैध गौन खनिज उत्खननावर महसूल व पोलीस विभागाचे कुठलेही लक्ष नसल्याने वडसा येथील नागोबा पेंडावरुण आज घडीला रोज शेकडो ट्रिप उपसा होत आहे. महसूल व पोलीस विभाग या अवैध गौन खनिज उत्खननावर कधी लगाम लावणार ? याकडे इतर वाळु पेंडातील लुप्त असलेल्या वाळु माफीयासह तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
मौजे वडसा गावात आणि गाव परिसरात वाळू साठा करण्याचे जवळपास पाच ते सहा ठिकाण आहेत. नदीपात्रातून वाळूचा उपसा करण्यासाठी जवळपास दहा ते वीस वाहनांचा वापर करून वाळू डम्पिंगच्या ठिकाणी आणली जाते तर हीच वाळू जेसीबीच्या माध्यमाने मोठ्या टिप्पर व हैवा मध्ये भरून विदर्भासह किनवट-माहूर तालुक्यात विक्रीसाठी पाठवली जात आहे. आता हा प्रकार गेल्या एक महिन्यापासून सुरू आहे. आणि असे असतांना देखील अद्याप तरी या वाळू वाहतूक करणाऱ्या विरोधात महसूल विभागाने कुठलीही कारवाई केल्याचे चित्र दिसत नाही. त्यामुळे महसूल विभाग आणि पोलीस विभाग याकडे लक्ष देतील का ? आणि या अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्या तथाकथित वाळू माफियांवर कारवाई करणार का ? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
वरीष्ठांनी या गंभीर प्रकराणाला गांर्भीयाने घेणे गरजेचे !
या संदर्भात एका वाळुवाहतुक करणाऱ्या कडून मिळालेल्या माहीतीनुसार असे कळते की, ज्या वाळु माफीयाचे सेटींग झालेले नसते त्याच वाळु वाहतुक करणाऱ्यावर प्रशासन कार्यवाही करीत असते आणी झालेली कार्यवाही ही निव्वळ देखाव्याची असते असे समजते, एक वेळा कार्यवाही झाली की मग सर्व काही सुरळीत सुरू असते असे समते, तेव्हा संबधीत प्रशासनातील वरीष्ठ अधिकार्यांनी या गंभीर प्रकाराकडे गांर्भीयाने घेणे गरजे झाले आहे.