श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| व्हाईस ऑफ मीडिया तालुका माहुर शाखेची बैठक दि.४ ऑक्टोंबर २०२४ रोजी स्थानिक एकविरा धाम येथे जिल्हाध्यक्ष डॉ.गणेश जोशी यांच्या अध्यक्षतेखाली तर राज्य सरचिटणीस श्रीनिवास भोसले जिल्हा कार्यकारिणी सदस्य अविनाश चमकुरे, डॉ.प्रविणकुमार सेलुकर, भगवान सुर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.याबैठकीत जेष्ठ पञकार विजय आमले यांची सर्वानुमते हात वर करून लोकशाही पद्धतीने दुसऱ्यांदा तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी फिरोज पठाण, सचिवपदी संजय बनसोडे यांची निवड करण्यात आली.
याबैठकीत व्हाईस ऑफ मीडिया तालुका माहुरतर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.यावेळी राज्य सरचिटणीस श्रीनिवास भोसले, यांनी मार्गदर्शन करतांना व्हाईस मिडिया हि पत्रकार संघटना देशातील पन्नास हजार सदस्य संख्या असलेली सर्वात मोठी संघटना असुन या संघटनेची गिणीजबुकमध्ये नोंद झाली आहे. संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर असल्याचे त्यांनी वेळी सांगितले, जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश जोशी यांनी पत्रकार संघटनेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या जन उपयोगी योजनांची माहिती दिली तसेच तालुका शाखेतर्फे संघटना वाढीसाठी सदस्य संख्या वाढवावी.
तसेच स्थानिक पातळीवर, रुग्णालयात फळवाटप, आरोग्य तपासणी शिबिर, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यासह समाज उपयोगी कार्यक्रम राबविण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते नूतन तालुका अध्यक्ष विजय आमले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार जयंत गिर्हे,सचिन बेहेरे, निखिल कोरडे, महीला पत्रकार सुरेखा तळनकर,सय्यद किरमाणी,पञकार नितेश बनसोडे, गजानन कुलकर्णी यांची ही उपस्थिती होती. तालुका अध्यक्षपदी बिनविरोध निवड केल्याबद्दल विजय आमले यांनी मान्यवरांचे तसेच सर्व सदस्यांचे आभार मानले.