Panganga river In Mahur : माहूर जवळील पैनगंगा नदीच्या पात्रातून वाळू उपसा सुरुच -NNL
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| माहूर महसूल प्रशासनानी अवैध वाळू उपस्याकडे लक्ष घालून वाळू साट्यावर छापे मारुण व अवैध वाळू वाहतुकीच्या मुख्य रस्त्यावर खंदक खोदून कार्यवाही करीत अवैध वाळूवर नियंत्रण ठेवण्यासाठी पावले उचले असलेतरी यात माञ त्यांना पाहिजे तसे यश मिळत नसल्याचे पहावयास मिळत आहे.
तालुक्यातील मौजे वडसा येथील नागोबा पेंडातून मोठ्या प्रमाणात अवैध मार्गाने वाळु विक्रीचा गोरख धंधा आजघडीला राजरोषपणे सुरूच आहे. आणि मुख्यतः वडसा व नागोबा मंदीराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वाळूची डंपिंग केली जात आहे.ही वाळू पैनगंगा नदीच्या पात्रातून अवैध मार्गाने उपसा करून विविध ठिकाणी साठवन केली जात आहे. जेसीबीच्या माध्यमातून टिप्पर व हैवा ट्रक मध्ये भरून त्याची वाहतूक विदर्भासह किनवट-माहूर तालुक्यातील काणाकोपर्याच्या ठिकाणी केली जात आहे.असे असले तरी महसूल व पोलीस प्रशासनाला का दिसत नाही ? असा ...
