देगलुर/नांदेड| मागील अनेक दिवसापासून देगलुर येथील आठवडी बाजारात मोबाईल चोरीच्या घटना घडत असल्याच्या अनेक तक्राराई पायावरून वरिष्ठांच्या आदेशाने देगलुर पोलिसांनी आठवडी बाजारात पळत ठेऊन मोबाईल चोरणाऱ्यास अटक करुन कार्यवाही केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक, नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश ऑउट अंतर्गत अवैद्य धंद्यावर कार्यवाही करण्याबाबत आणि मागील गुन्हे उघडकीस आनणे बाबत पोलीस निरीक्षक, देगलुर यांना आदेशीत केले होते. त्यानुसार मारोती श्रीराम मुंडे, पोलीस निरीक्षक, देगलुर यांनी गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांना देगलुर शहरातील आठवडी बाजारात मोबाईल चोरट्यांचा आरोपीचा शोध घेणे करीता तात्काळ रवाना केले. गुन्हे शोध पथकातील पोलीस अमलदार यांनी देगलुर शहरातील आठवडी बाजारात दोन मोबाईल चोरी करणारा आरोपी नामे प्रमोद उर्फ पिंटु श्रीपती सोनकांबळे, वय 39 वर्ष, रा.धडकनाळ, ता. उदगीर, जि. लातुर यास ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातुन बाजारातुन चोरीस गेलेले 1) एक Real me 8 5 G मोबाईल व 2) एक OPPO A53 मोबाईल असे जप्त केले आहे. यातील नमुद अधिकारी व अमलदार यांनी उत्कृष्ठ कामगीरी केली आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी दिनांक 07/12/2024 रोजी 17.00 वा. चे सुमारास चौडेकर दाताचा दवाखाना समोर भाजीपाला मार्केट देगलुर, ता. देगलुर अथादि बाजारात प्रमोद उर्फ पिंटु श्रीपती सोनकांबळे, वय 39 वर्ष, रा. धडकनाळ, ता. उदगीर, जि. लातुर या मोबाईल चोरट्याकडून मोबाईल 1) 10,000/- एक Real me 85G मोबाईल IMEI No. (1) 8635190506 85259 (2) 863519050685242 ज्यात Airtel सिमकार्ड 9730182095 व VI सिमकार्ड 9421567510 कि.अं. 2) 8,000/- एक OPPO A53 मोबाईल IMEI No. (1) 868911055538150 (2) 68911055538143 ज्यात Airtel सिमकार्ड 9665115720 व जिओ सिमकार्ड 9373035559 कि.अं. एकुन 18,000/- रुपये. असा मुद्देमाल जप्त केला आहे. गु.र.नं. व कलम अंतर्गत 555/2024 कलम 303(2) भा. न्या. संहिता अन्वये फिर्यादी हरी मारोती चाकोते, वय 43 वर्ष, व्यवसाय खाजगी नोकरी, भायेगाव रोड आनंद नगर देगलुर, यांच्या तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हि कार्यवाही अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक साहेब, नांदेड (भा.पो.से.), खंडेराव धरणे, अपर पोलीस अधिक्षक, भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, संकेत गोसावी, उपविभागीय पोलीस अधिकारी, देगलुर यांचे मार्गदर्शनाखाली, मारोती श्रीराम मुंडे, पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे, देगलुर पोना/580 कृष्णा तलवारे, पोकॉ/1788 मलदोडे, पोकॉ/2613 सगरोळीकर, पोकॉ/2851 मोटरगे व पोकॉ / 3141 बुंगई यांनी केली आहे. या कार्यवाहीबद्दल वरिष्ठानी पोलिसांचे अभिनंदन केले आहे.